rajkiyalive

sangli vidhansabha news : सांगली शहरात गाडगीळांना तब्बल 28 हजाराचे मताधिक्य

पृथ्वीराज पाटलांना 2 तर जयश्रीताईंना 1 गावात मताधिक्य

sangli vidhansabha news : सांगली शहरात गाडगीळांना तब्बल 28 हजाराचे मताधिक्य: सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एकतर्फी विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. आ. गाडगीळ यांना शहरात तब्बल 28 हजाराचे मताधिक्य मिळाले. यामध्ये सांगलीवाडी, कुपवाड, वानलेसवाडी यासह शहरातील गावभाग, विश्रामबाग, जुना बुधगाव रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. तर ग्रामीण भागात 8 हजाराचे मताधिक्य घेतले. यामध्ये नांद्रे, माधवनगर, बुधगाव, हरिपूर, बामणोली आदी 11 गावात मताधिक्य मिळाले. तर पृथ्वीराज पाटील यांना वाजेगाव, कावजी खोतवाडी व जयश्री पाटील यांना पद्माळे येथून मताधिक्य मिळाले.

sangli vidhansabha news : सांगली शहरात गाडगीळांना तब्बल 28 हजाराचे मताधिक्य

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपच आ. सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांच्यात तिरंगी लढत होईल, असे वाटत होते. त्यासाठी चुरशीने देखील मतदान झाले होते. मात्र या निवडणुकीत आ. सुधीर गाडगीळ यांनी एकतर्फी विजय मिळवल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांना 1 लाख 12 हजार 498 तर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना 76 हजार 363 अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना 32 हजार 736 मते मिळाली. या निवडणुकीत आ. गाडगीळ 36 हजार 135 मतांनी निवडून आले. सांगली शहराबरोबर त्यांनी ग्रामीण भागात देखील आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. ग्रामीण भागात देखील त्यांनी जोरदार मुसंडी घेतली.

नांद्रे या गावात त्यांनी तब्बल 1 हजार 664 मताधिक्य घेतले. तर दुसरीकडे माधवनगर येथे 1 हजार 513, बुधगाव येथे 1 हजार 508, बामणोली येथे 1 हजार 328, हरिपूरला 1 हजार 188, अंकलीला 594, बिसूरला 235, कर्नाळला 419, इनामधामणीला 145 मताधिक्य मिळवले. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी कावजी खोतवाडीला 241 तर वाजेगावला 51 मताधिक्य घेतले. तर ठिकाणी त्यांना मात्र मताधिक्य घेता आले नाही. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांनी ग्रामीण भागातील केवळ पद्माळे गावात 641 चे मताधिक्य घेतले. इतर ठिकाणी मात्र तीन नंबरला राहिल्या. ग्रामीण भागातील अनेक महिला व नागरिकांनी भाजपला साथ दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर दुसरीकडे आ. सुधीर गाडगीळ यांचा शहरी भागात देखील डंका कायम आहे. शहरी भागात त्यांनी तब्बल 27 हजाराचे मताधिक्य घेतले आहे. त्यामध्ये सांगली शहरात त्यांनी तब्बल 21 हजार 534 मताधिक्य घेतले आहे. या बरोबर कुपवाड शहरात 4 हजार 179, सांगलीवाडी शहरात 1 हजार 468 तर वानलेसवाडी येथे 221 चे मताधिक्य मिळाले आहे. शहरी भागातील गुजराती हायस्कूल परिसर, रतनशीनगर, गणपतीपेठ परिसर, हरभटरोड, हायस्कूलरोड, गावभाग, विश्रामबाग, धामणीरोड आदी परिसरात त्यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे.

काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना शंभरफुटी परिसर, पाकिजा मस्जिद परिसर, गणेशनगर, खणभाग, नळभाग या परिसरात मताधिक्य मिळाले आहे. मात्र इतर भागात काँग्रेसकडे मतदारांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. तर संजयनगर, वसंतदादा साखर कारखाना परिसराबरोबर काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात देखील भाजपने जोरदार मते घेतली आहेत. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील व अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रभागात देखील आ. सुधीर गाडगीळ यांना चांगली मते पडली आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज