mseb news : वीज थकबाकीदारांच्या अभय योजनेला मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हा ः महावितरणचे आवाहन : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना 2024 ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले.
mseb news : वीज थकबाकीदारांच्या अभय योजनेला मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हा ः महावितरणचे आवाहन
जिल्ह्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपली आहे. या योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणार्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील 65,445 वीज ग्राहकांनी आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 86 कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना 44 कोटी 35 लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ झाला आहे.
कोल्हापूर परिमंडळ (6101 ग्राहक) आणि पुणे परिमंडळ (5893 ग्राहक) ही परिमंडळे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत. विभागांमध्ये नागपूर विभाग 20,400 लाभार्थी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्या नंतर कोकण विभाग (17,798), पुणे विभाग (17,448) व छत्रपती संभाजीनगर (9818) यांचा क्रम लागतो.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
असा लाभ घ्या
संबंधित वीज ग्राहकांना डब्ल्युडब्ल्युडब्ल्युमहाडिसकॉम.इन वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल पवरून योजनेचा लाभ घेता येईल. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



