ichalkarnji crime news : इचलकरंजीत भरधाव डंपरने चिरडल्याने पती पत्नी ठार भरधाव डंपरने, पंचगंगा नदीवरील गणपतीचे दर्शन घेऊन मोटरसायकलवरून घरी परतणार्या पती- पत्नीना चिरडल्याने दोघेही ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज सकाळी नदी रस्त्यावरील यशोदा पुलानजिक घडली.संजय सदाशिव वडिंगे वय वर्षे 59 व सौ.सुनिता संजय वडिंगे वय वर्षे 50 अशी या मयत दुर्दैवी दाम्पत्याची नावे असून ते रहात असलेल्या मंगळवार पेठेवर शोककळा पसरली होती.डंपर चालक शब्बीर चांदोरकर जर्मन वय 37 वर्ष रा.दत्तनगर, शहापूर याला पोलीसांनी अटक केली.
ichalkarnji crime news : इचलकरंजीत भरधाव डंपरने चिरडल्याने पती पत्नी ठार
मयत संजय वडिंगे हे होमगार्ड पथकाचे निवृत्त प्रभारी अधिकारी होते. ही घटना कळताच होमगार्ड पथकातील जवानांनी आयजीएम इस्पितळ परिसरात गर्दी केली होती.संजय वडिंगे हे आपल्या पत्नीसह रोज सकाळी ठिकाणच्या मंदिरात देवदर्शनासाठी फिरत असतात त्या प्रमाणे आजही ते सकाळी पंचगंगा नदी तीरावरील रेणुकामाता, महादेव मंदीर व वरविनायक गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या सी.डी.100 डिलक्स मोटरसायकलने घरी परतत होते.ते यशोदा पुलानजिक आले असता मागून बोरगावहून येणार्या डंपरने चिरडले.
अपघात इतका भीषण होता की पत्नीच्या पोटावरुन डंपरचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या तर संजय यांच्या पूर्ण अंगावरून चाक गेल्याने तेही गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ उपचारासाठी आयजीएम इस्पितळात दाखल करण्यात आले पण इथल्या डॉक्टरांनी उपचारासाठी असमर्थता दर्शवल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात आले.पण उपचार सुरु असताना त्यांचाही मृत्यू झाला.
याबाबत मुलगा सुरज संजय वडिंगे वय वर्षे 37 याने गावभाग पोलीसात फिर्याद दिली असून पो.नि.प्रविण खानापुरे यांनी गुन्हा नोंद करुन पुढील तपास करत आहेत. संजय वडिंगे हे मंगळवार पेठेतील वडिंगे गल्लीत राहाणारे असून त्यांचे हसरे व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांना ओळखणारे खूप आहेत.तसेच होमगार्ड पथकातील ते सर्व जवानांना जवळचे वाटायचे त्यांच्या या अपघाती मृत्यूने संपूर्ण शहरातही हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



