सांगली जिल्हयात राजारामबापू कारखान्याने फोडली ऊस दराची कोंडी
jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये : प्रतिक पाटील : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटकडील सन 2024-25 हंगामातील ऊसास पहिला हप्ता 3200 रुपये प्रतिटन देणार आहे. सन 2024-25 मधील अंतिम दर अंदाजे 3275 रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम दिपावलीच्या सणास देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी दिली. जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
jayant patil news : राजारामबापू कारखान्याचा पहिला हप्ता 3200 रूपये : प्रतिक पाटील
अध्यक्ष प्रतिक पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ठिंबक सिंचन योजना, सच्छिंद्र पाईप योजना, विविध खते, जैविक खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांना पुरविली जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रात सह.पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून शेतीस पाणीपुरवठा केला जात आहे. शेती उपयोगी वस्तू कमी दरात शेतकर्यांना दिल्या जात आहेत.
आ.जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री असताना दुष्काळी भागास पाणीपुरवठा करणा-या योजनाना गती दिल्याने दुष्काळी भागात पाणी उपलब्ध झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रतिक पाटील म्हणाले, कारखाना व्यवस्थापनाने सन 2024-25 हंगामात साखराळे युनिटकडे 9 लाख 50 हजार मे. टन, वाटेगाव- सुरुल युनिटकडे 5 लाख मे.टन, कारंदवाडी युनिटकडे 4 लाख 50 हजार मे.टन तसेच जत- तिप्पेहळ्ळी युनिटकडे 3 लाख असे एकूण 22 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे.
तरी सर्व ऊस उत्पादक व सभासद यांनी पिकविलेला सर्व ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन प्रतिक पाटील यांनी केले आहे. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदिपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहूली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.