चार महिन्यांपासून भरपाईची प्रतिक्षा, जिल्हा प्रशासनाने मागितले 11 कोटी
sangli news : जिल्ह्यात 17 हजार शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित : जुलै आणि ऑगष्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याचा फटका चार तालुक्यांना बसला होता. मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यातील 17 हजार 35 शेतकर्यांचे सुमारे 6 हजार 145 हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळ अशी पिके वाया गेली. ऊस, सोयाबीन, मका, ज्वारी, हळद, भाजीपाल्यासह 10 कोटी 92 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. मात्र सरकारकडून निधी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकर्यांत नाराजी आहे.
sangli news : जिल्ह्यात 17 हजार शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित
गतवर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी आणि धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यांना फटका बसला. पुराच्या पाण्यामुळे ऊस, सोयाबीन, भात, भूईमूग, पपई, केळी, द्राक्षांसह भाजीपाला वाया गेला.
वारणा, कृष्णा नदीकाठावरील 17 हजार 35 शेतकर्यांची 6 हजार हेक्टरवरील पिके वाया गेल्याचे स्पष्ट झाले असून 11 कोटी 92 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवालाल स्पष्ट झाले, नुकसानभरपाई मिळण्यासाठी तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
पुराच्या पाण्याने सर्वाधिक 4 हजार 805 हेक्टरवरील ऊस वाया गेला आहे.
याशिवाय सोयाबीन 560 हेक्टर, भुईमूग 467 हेक्टर, भात 41 हेक्टर, मका 10.38 हेक्टर, ज्वारी 7.71 हेक्टर, हळद 4.36 हेक्टर, कडधान्ये 17.90 हेक्टर, फुलपिके 1 हेक्टर, चारा पिके 170 हेक्टर भाजीपाला 73.53 हेक्टर असे मिळून 6 हजार 159 हेक्टरवरील पिकांचे 10 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान झाले. फळ पिकांचे 36 शेतकर्यांचे पेरु 1.10 हेक्टर, पपई 4.15 हेक्टर, केळी 2.97 हेक्टर असे मिळून 8.22 हेक्टरवरील 2 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते.
मिरज तालुक्यात सर्वाधिक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील 4 हजार 32 शेतकर्यांचे सुमारे 2 हजार 588 हेक्टरवरील 4 कोटी 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील 5 हजार 178 शेतकर्यांचे 1 हजार 649 हेक्टरवरील 3 कोटी 6 लाख, शिराळा तालुक्यातील 5 हजार 502 शेतकर्यांचे 1 हजार 718 शेतकर्यांचे 3 कोटी 9 लाख, पलूस तालुक्यातील 1 हजार 272 शेतकर्यांचे 203 हेक्टरवरील 34 लाख 92 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. शेतकरी सहा महिन्यांपासून नुकसारभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत.
ऑक्टोंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती,
या कालावधीत अतिवृष्टी नुकसानभरपाईची रक्कम आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली होती. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मदत मिळेल, असा विश्वास होता. सरकार येवून दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. परंतु सरकारकडून निधी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकर्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अतिवृष्टी, पुरामुळे पिकाचे नुकसान
तालुका शेतकरी क्षेत्र रक्कम (कोटीत)
मिरज 4,032 2,588 4.40
वाळवा 5,178 1,649 3.06
शिराळा 5,502 1,718 3.09
पलूस 1,272 203 34.92 लाख

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



