ः बाजार समितीचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु
सांगली बाजार समिती ब्रँडिंगमधून नावलौकिक मिळवेल
खासदार विशाल पाटील : सांगली बाजार समितीचा देशभर नावलौकीक आहे. समितीत आलेली हळद, बेदाणा यासह अन्य शेतीमाल आकर्षक पॅकिंग, ब्रँडिंग करुन परदेशात विक्री करण्यासाठी नेटवर्क उभारण्यासाठी त्यासाठी बाजार समिती, व्यापारी, शेतकर्यांच्या पुढाकारातून नावलौकीक वाढवेल, असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी केले.
सांगली बाजार समिती ब्रँडिंगमधून नावलौकिक मिळवेल
खासदार विशाल पाटील
मार्केट यार्डातील मुख्यालयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ शुक्रवारी खासदार पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील, सचिव महेश चव्हाण, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, व्यापारी, उपस्थित होते. याप्रसंगी ऑनलाईन सेवा आणि बाजार समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
शेतकर्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी बाजार समितची स्थापना केली.
खासदार पाटील म्हणाले, शेतकर्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी बाजार समितची स्थापना केली. शेतकरी, व्यापारी, हमाल, संचालकांच्या मदतीने बाजार समितीचा विस्तार झाला. बाजार समितीत काही चुकाही घडल्या तरीही बाजार समिती आजही भक्कमपणे उभी आहे. बाजार समिती एक शेतकर्यांसाठी कृषी विभागाच आहे. त्यामुळे हळद, गूळ, बेदाणा यासाठी नवा आराखडा तयार करण्याची गरज आहे. हळद, गूळ, बेदाणा आदींच्या गुणवत्तापूर्ण प्रतवारी, पॅकिंग आणि बँड करुन देशात नव्हे परदेशातही विक्रीची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या उत्पादनांत प्रक्रिया करून त्यांची देशात नव्हे तर परदेशात निर्यात झाली पाहिजे. त्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. राजकारण विरहित संस्था म्हणून समितीकडे पहा. सांगली बाजार समितीवर सर्व पक्षीय संचालक आहेत. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करीत आहे. राज्यात नव्या सरकारच्या पणन विभाग, केंद्र सरकारच्या काही योजनांतून समितीच्या विकासाचा प्रयत्न आहे.
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, वसंतदादांनी बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापार्यांसह अनेक घटकांना फायदा झाला. समितीत राजकारणाचा परिणाम मात्र जास्त आहे. राजकारणामुळे बाजार समितीत कमिटीत होणारी उलाढाल किंवा व्यापार बदलला. पुढच्या काळात बाजार समितीकडून शेतकरी, व्यापार्यांच्या अक्षेपा वाढणार आहेत. पुढच्या काळात शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच या मार्केट कमिटीचा काम करावे. नवीन नवीन यंत्रणा येत आहेत. त्या सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. भविष्यात केद्र व राज्य शासनाच्या योजनांतून विकासासाठी संचालकांनी प्रयत्न करावा.
सभापती सुजय शिंदे म्हणाले, बाजार समितीत नव्याने संचालक म्हणून काम करताना वसंतदादांचे विचार डोळ्यासमोर ठवून काम केले. गुळ, हळदीसह अन्य पिकांच्या उत्पाद वाढीसाठी काही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. आम्हाला या क्षेत्रातील दिग्गजांनी मार्गदर्शनाखाली समितीची सुरु असलेली वाटचाल भविष्यात अशीच सुरु ठेवली जाईल. ‘अमृत हळद़’ प्रकल्पाचा मनोदय आहे. रासायनिक अंश विरहित उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय समितीचे उत्पन्नवाढीवरही लक्ष असेल.
दादांच्या संस्थेकडे राजकीय नजरेने पाहू नका
सांगली बाजार समितीकडे राजकीय दृष्टीने काही जण पाहतात. वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या समितीकडे त्या नजरेने कोणी पाहणार नाही, असा विश्वास खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केला. सध्याचे बाजार समिती संचालक सर्व पक्षीय संचालक आहेत. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुर्वणमहोत्सवी वर्षापर्यंत समितीच्या विस्ताराचा आराखडाच आखावा. दादांनी लावलेले रोपट्यांचा वटवृक्ष पुढील काळात जपला जावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



