rajkiyalive

sangli news : सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीचा टक्का घटणार

नैसर्गिक आपत्ती, हवामान बदलाचा दणका, उत्पादनही घटले

sangli news : सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीचा टक्का घटणार : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीसाठी यंदा सर्वाधिक 10 हजार 156 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत आखाती देशात 27 कंटेनरद्वारे चारशे टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून युरोपीय देशात निर्यात सुरू होणार आहे. गतवर्षी 9 हजार 524 शेतकर्‍यांनी 17 हजार 318 टन निर्यात केली होती. नैसर्गिक आपत्ती, विविध कारणांमुळे द्राक्षबागांमध्ये झालेल्या घटीमुळे यंदा जेमतेम 11 हजार टन निर्यात शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

sangli news : सांगली जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीचा टक्का घटणार

सांगली जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणून देशभर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून युरोप, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात द्राक्षाला मोठी मागणी आहे. मागील काही वर्षामध्ये द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. तासगाव, मिरज, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यातून युरोप आणि दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थिीतीतूनही शेतकर्‍यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा चांगल्या पद्धतीने तयार केल्या जातात.

यंदा द्राक्ष निर्यातदार शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे.

गेल्या पाच वर्षात निर्यातदारांची संख्या सुमारे चार पटीने वाढली आहे. राज्यात नाशिकनंतर सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात होतात. त्यातून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळते. त्यात सांगली जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. जिल्ह्याचे द्राक्षाचे क्षेत्र एक लाख 20 हजार एकरांवर आहे. निर्यातक्षम द्राक्षबागेची ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत आता 15 जानेवारीपर्यंत होती.

देशात डिसेंबरपासून द्राक्षांची निर्यात सुरू होते. त्यानंतर जानेवारीपासून युरोपियन देशांत द्राक्ष निर्यात होते.

यावेळी यास विलंब होताना दिसत आहे. गंदा सततच्या पावसामुळे द्राक्षाच्या फळ छाटण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. यंदा ऑक्टोबरनंतरही नोव्हेंबरमध्ये छाटण्या झाल्या आहेत. दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी युरोपीय देशांत 828 कंटेनरमधून 9 हजार 702 टन, तर इतर देशांत 489 कंटेनरमधून 7 हजार 616 टन द्राक्षे निर्यात झाली होती. गेल्यावर्षी द्राक्ष निर्यातीसाठी 9 हजार 524 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. त्याद्वारे 5 हजार 313 हेक्टरवरील द्राक्षे सातासमुद्रापार पोहोचली. यंदा 10 हजार 156 शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून, 5 हजार 15 हेक्टर क्षेत्र नोंदविण्यात आले आहे.

स्थानिक बाजारपेठेतही दरात वाढ

जिल्ह्यात द्राक्षाचे एकरी सरासरी दहा टन उत्पादन निघते. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीत पाच ते सात टन उत्पादन शक्य आहे. सध्या आखाती देशांत द्राक्षे जात असून, किलोला सरासरी 90 ते 120 रुपये दर मिळतो आहे. युरोपीय देशात निर्यात सुरु झाल्यानंतर यापेक्षा अधिक म्हणजे प्रतिकिलो सुमारे 110 ते 140 रुपये दर मिळत आहे. परंतु यंदा दर चांगले असले तरी उत्पादन घटणार आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज