rajkiyalive

tasgaon news : शाळेला दांडी मारणार्‍या बस्तवडे शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर निलंबित

tasgaon news : शाळेला दांडी मारणार्‍या बस्तवडे शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर निलंबित : तालुक्यातील बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर, शिक्षक दीपाली भोसले, दीपक माळी यांनी रजा न घेता शाळेला ’दांडी’ मारली होती. शनिवार 15 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी मुख्याध्यापिका मिरजकर यांना निलंबित करण्यात आले आहे. 

tasgaon news : शाळेला दांडी मारणार्‍या बस्तवडे शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर निलंबित

’सीईओं’चा दणका :  इतर शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीला कारणे दाखवा नोटीस

 भोसले व माळी या शिक्षकांसह गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शाळा व्यवस्थापन समितीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही कारवाई केली आहे.

याबाबत माहिती अशी : बस्तवडे येथे पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. याठिकाणी 65 विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे मुख्याध्यापक म्हणून विद्या मिरजकर काम पाहत होत्या. तर दीपाली भोसले व दीपक माळी हे दोन शिक्षक याठिकाणी ज्ञानार्जनाचे काम करतात. शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात शाळा होती. सकाळी 7.20 ला शाळा भरते. मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत आला नव्हता. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने शाळेत धाव घेतली.

त्यावेळी मुख्याध्यापिका मिरजकर या आपल्या मुलीचा साखरपुडा असल्याने रजा न घेताच कोल्हापूरला गेल्याचे समजले.

तर दीपाली भोसले याही कोल्हापूरला गेल्याची माहिती मिळाली. दीपक माळी नावाचे शिक्षकही तासगाव येथील आपल्या घरातून कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. एका झिरो शिक्षिकेने सकाळी शाळा उघडली होती.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी ही बाब गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीने बस्तवडे शाळेत धाव घेतली. यावेळी शाळा रामभरोसे असल्याचे दिसून आले. मुख्याध्यापिका मिरजकर यांनी सलग तीन दिवस रजा न घेता शाळेला ’दांडी’ मारली होती. भोसले व माळी नावाचे शिक्षकही रजा न घेता अध्यापनाच्या कामावर गैरहजर होते.

tasgaon-news-vidya-mirajkar-principal-of-bastawade-school-suspended

गटशिक्षणाधिकारी लावंड यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्याकडे पाठवला होता. गायकवाड यांनी हा अहवाल स्वयंस्पष्टतेसह मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्याकडे पाठवला होता. याप्रकरणी धोडमिसे यांनी मुख्याध्यापिका मिरजकर यांना निलंबित केले आहे. तर दीपाली भोसले व दीपक माळी यांच्यावरही कारवाई का करू नये, अशी विचारणा करून नोटीस काढली आहे.

तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनागोंदी कारभार सुरू असताना त्यावर गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियंत्रण नाही. कामात हलगर्जीपणा केला जात आहे, असा ठपका ठेवून गटशिक्षणाधिकारी लावंड, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शाळा व्यवस्थापन समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज