rajkiyalive

bangladesi man in sangli : बांग्लादेशमध्ये राजकीय उलथापालथीमुळे तो आला सांगलीत

बांगलादेशी घुसखोराचा शहर पोलिसांनी केला उलगडा :

bangladesi man in sangli : बांग्लादेशमध्ये राजकीय उलथापालथीमुळे तो आला सांगलीत: शहर पोलिसांनी रविवारी सकाळी पेट्रोलिंगवेळी अटक केलेला बांगलादेशी घुसखोर अमीर शेख उर्फ एम डी अमीर हुसेन (वय 62, रा. उत्तर अदाबोर, मोहम्मदपूर, ढाका, बांगलादेश) हा सांगलीत कसा आला, याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. बांगला देशातील राजकीय उलथापालथीमुळे त्याने कुटूंबियांना सोडून भारतात घुसखोरी केल्याचे त्याने सांगितले आहे.

bangladesi man in sangli : बांग्लादेशमध्ये राजकीय उलथापालथीमुळे तो आला सांगलीत

पुणे, मुंबई शहरे महागडी असून त्याला सांगली, कोल्हापूर सारख्या निमशहरी भागात जाण्याचा सल्ला मिळाला. तो शिवशाहीने सांगलीत आल्याचे तपासात समोर आले आहे. पण एकाच दिवसात तो शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करीत होते. रविवारी सकाळी या पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर अमीर हुसेन संशयितरीत्या मिळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने दिल्लीचा रहिवाशी असल्याचे आधार कार्डही दाखवले उपनिरीक्षक पोवार यांना त्याच्या बोलण्याचा संशय आला.

त्याला मराठी समजत नव्हते. हिंदी बोललेले फारसे कळत नव्हते. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर शेख याने तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले. शहर पोलिसांनी त्याला अटक केली.

bangladesi-man-in-sangli-he-came-to-sangli-due-to-political-upheaval-in-bangladesh

अमीर हुसेन बांगलादेशातून आगरतळा येथे आला. तेथून तो कोलकत्ताला आला. तिथे त्याने बनावट आधारकार्ड बनविले. कोलकत्त्याहून तो विमानाने पुण्यात आला. पुण्यातून तो पुन्हा रेल्वेने कल्याणकडे निघाला होता. रेल्वेत काहींनी त्याला सांगली, कोल्हापूर, सातार्‍याला जाण्याचा सल्ला दिला. त्याने पुन्हा पुणे गाठले. तेथून शिवशाही बसने सांगलीत आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सिव्हील हॉस्पीटल चौकात तो एका लॉजवर राहण्यास होता. रात्री जेवण करण्यासाठी तो बाहेर पडला. पण रस्ता चुकला. रात्रभर तो फिरत होता. अखेर सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली.

बनावट कार्डासाठी 20 हजार केले खर्च…

अमीर हुसेन हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. बांगला देशातील राजकीय उलथापालथीमुळे त्याने कुटूंबियांना सोडून भारतात घुसखोरी केली. भारतात येताना तो एक लाख रुपये सोबत घेऊन आला होता. आधारकार्ड व इतर कागदपत्रे बनविण्यासाठी त्याने 20 हजार रुपये खर्च केले. दहा हजाराचे विमान तिकीट काढून तो पुण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज