ladki bahin yojna : सांगली जिल्ह्यात 6 लाख लाडक्या बहिणींना आले 180 कोटी : राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि होळी सणाचे औचित्य साधत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे दोन टप्प्यात रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. जिल्ह्यातील 6 लाख महिलांच्या खात्यावर तब्बल दोन महिन्यांचे मिळून 180 कोटी रुपये जमा झाले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना एकाच महिन्यात 3 हजार रुपये जमा झाल्याने खुशीत आहेत.
ladki bahin yojna : सांगली जिल्ह्यात 6 लाख लाडक्या बहिणींना आले 180 कोटी
फेबु्रवारी, मार्चची रक्कम बँक खात्यात जमा
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. योजनेचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाला, त्यामुळे निवडणुकीनंतरही योजना सुरुच आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याची रक्कम 26 जानेवारीला जमा करण्यात आली होती. त्यानंतर फेबु्रवारी आणि मार्च महिन्याची रक्कम कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बहिणींच्या खात्यावर फेबु्रवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात आला होता.
मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते.
होळी सणाच्या मुहुर्तावर बहिणींच्या खात्यावर मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 लाख 28 हजार 160 महिलांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी 7 लाख 10 हजार 772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या दहा हजार महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र झाले आहेत. अर्ज मंजूर झालेल्यांचे अनुदान झाले आहे.
जिल्ह्यातही आतापर्यंत फेबु्रवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 6 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुमारे 180 कोटी रुपयांची ओवाळणी शासनाकडून जमा झाली आहे. ज्या काही महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाला नाही, त्यांना दुसर्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



