rajkiyalive

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये अघोरी पूजा करणार्‍या भोंदू बाबा जेरबंद

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये अघोरी पूजा करणार्‍या भोंदू बाबा जेरबंद : सांगली : शनिवारी मध्यरात्रीची वेळ…एका शेतात अघोरी पुजा मांडलेली…करणी काढण्यासाठी लखनौचा भोंदू बाबूजी तंत्रमंत्र म्हणत होता. अचानक सांगली ग्रामीण पोलिसांची पथक धडकले आणि भोंदू बाबूला थेट पोलिस ठाण्यातच आणले. रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली. मोहमंद जावेद अमानउल्ला मतीहउल्ला उर्फ बाबूजी (वय 75, रा. दशहरी काकोरी, लखनौ, उत्तरप्रदेश) असे भोंदू बाबाचे नाव आहे. ग्रामीण पोलिस व अनिंसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. याबाबत बिराप्पा मल्लिकार्जून पांडेगावकर (वय 36, रा. कसबेडिग्रज, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली.

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजमध्ये अघोरी पूजा करणार्‍या भोंदू बाबा जेरबंद

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबूजी लखनऊ या नावाने मोहमंद मतीहउल्ला डिग्रज परिसरात परिचित आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा या परिसरात वावर आहे. या भोंदू बाबाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे फिर्यादी बिराप्पा पांडेगावकर यांनी गत आठवड्यात तक्रार केली होती. पांडेगावकर याच्यावर कुणीतरी करणी केली आहे. ती उतरविण्याची भीती दाखवून भोंदू बाबूजीने अघोरी पुजा करण्यास सांगितले होते.

अनिंसने पांडेगावकर यांना डमी गिर्‍हाईक बनवून त्या बाबूकडे पाठवले.

त्या बुवाने करणी उतरवण्यासाठी 9 हजार रुपये खर्च येईल आणि शनिवारीच्या रात्री बारा वाजता एक अघोरी पूजा करावी लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे कसबे डिग्रज येथे अघोरी पूजा करण्यासाठी आला. काळी बाहुली, लिंबू, पिन, हळदी कुंकु असे बरेच साहित्य मांडून अघोरी पूजा मांडली होती. याबाबत सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले यांना अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती दिली.

kasbe-digraj-crime-news-a-fake-baba-performing-aghori-worship-arrested-in-kasbe-digraj

चौगुले यांनी तातडीने दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांना पूजेच्या ठिकाणी पाठवले. पोलिसांनी पूजेचे साहित्य जप्त करून बाबूजी लखनऊ याला रात्री पोलीस स्टेशनला आणले. त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

भोंदूबुवांच्या थापांना बळी पडू नये : अनिसचे आवाहन.

करणी, भानामती, काळी जादू याची भीती घालून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहे. जगात कोणाला करणी करता येत नाही किंवा उतरवता येत नाही. त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवू नये आणि भोंदूबुवांच्या थापांना बळी पडू नये, अशा भोंदू बाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे आवाहन राहुल थोरात यांनी केले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज