rajkiyalive

jayant patil news : सभासदांच्या मुलांना राजारामबापू कारखान्याकडून 11 लाखाची मदत

jayant patil news : सभासदांच्या मुलांना राजारामबापू कारखान्याकडून 11 लाखाची मदत : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आरआयटी) मध्ये शिकत असणार्‍या कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकर्‍यांच्या 141 मुला-मुलींना 10 लाख 88 हजार 400 रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश आरआयटीला देण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी हा धनादेश आरआयटीचे संचालक डॉ.पी.व्ही.कडोले यांच्याकडे सुपूर्द केला.

jayant patil news : सभासदांच्या मुलांना राजारामबापू कारखान्याकडून 11 लाखाची मदत

याप्रसंगी आरआयटीच्या कार्यकारिणी चे सदस्य प्रा.शामराव पाटील,कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर.डी.सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.

माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ग्रामीण भागातील सभासद शेतकर्‍यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्या फीमध्ये कारखान्याच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्याची परंपरा आहे. ही परंपरा कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक दादा पाटील यांच्या पुढाकाराने पुढे नेली जात आहे. ही मदत कारखान्याच्या राजारामबापू इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून दिली जाते.

बीटेक-एमटेकच्या 84 विद्यार्थी- विद्यार्थिनीं ना 8 लाख 40 हजार,डिप्लोमाच्या 33 विद्यार्थी-विद्यार्थिनींना 1 लाख 18 हजार 800,एमबीए-एमसीएच्या 12 विद्यार्थी- विद्यार्थिनींना 93 हजार 600,तर बीबीए-बी सीएच्या 12 विद्यार्थी-विद्यार्थिनींना 36 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

jayant-patil-news-11-lakhs-assistance-from-rajarambapu-factory-to-members-children

याप्रसंगी कारखान्याचे सचिव डी.एम. पाटील,मुख्य लेखापाल संतोष खटावकर, आरआयटीच्या रजिस्टार सौ.सारिका पाटील, प्रा.डी.एस.पाटील उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज