rajkiyalive

panchganga karkhana news : पंचगंगा कारखाना निवडणूक आयोगाच्या विचाराचे अनृ नियमांचे दिवाळे

दिनेशकुमार ऐतवडे

panchganga karkhana news : पंचगंगा कारखाना निवडणूक आयोगाच्या विचाराचे अनृ नियमांचे दिवाळे : इंचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. परंतु गेल्या मह्रिन्यात रत्नापाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनी मगदूम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याने निवडणूक आयोगाने ही निवडणूकच रद्द केली.

panchganga karkhana news : पंचगंगा कारखाना निवडणूक आयोगाच्या विचाराचे अनृ नियमांचे दिवाळे

आता पुन्हा 11 मे रोजी पुन्हा नव्याने निवडणुका होत आहेत. रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक झाल्यानंतर संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर निवडणूक रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची देशातील ही दुर्मिळ घटना आहे. निवडणूक आयोगाने आपच्या विचारांची आणि नियमांची दिवाळखोरी जाहीर केली आहे की काय अशा शंका घेण्यास वाव आहे.

देशभक्त रत्नापाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची स्थापना राज्यातील ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी इंचलकरंजी येथे केली. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार हे इंचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी संस्थान विलिनीकरणात सहभाग घेतला. भारतीय संविधान समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा कारखान्याची स्थापना झाली. त्यामुळे इचलकरंजी आणि आसपासच्या गावच्या विकासाला चालना मिळाली. या कारखान्याच्या स्थापनेमुळे स्थानिक शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आणि सहकार चळवळीचा विस्तार झाला.

पंचगंगा साखर कारखाना आपल्या दरासाठी प्रसिध्द आहे. 2023 मध्ये कारखान्याने उसाला प्रती टन 3300 रूपये दर दिला आहे. जो राज्यातील सर्वाधिक होता. कारखान्याने आपल्या गाळप क्षमतेत वाढ केली असून, 5 हजार टीसीडीवरून 10 हजार टीसीडी पर्यंत विस्तार करण्याची योजना आखली आहेे.

पंचगंगा कारखान्याची निवडणूक दर पाच वर्षांनी होती. तीन मह्रिन्यापूर्वी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने विजय मिळविला. त्यामध्ये काही नवीन सदस्यांनाही संधी मिळाली. परंतु या निवडणुकीत अर्ज छाननीमध्ये पक्षपाती झाला आहे अशी तक्रार विरोधी गटातर्फे रजनी मगदूम यांनी केली. त्यांच्या तक्रारीनुसार निवडणूक आयोगाने ही पूर्ण निवडणूकच रद्द केली आणि पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरू केली. आता ही निवडणूक पुन्हा एकदा 11 मेला होत आहे. एखाद्या संस्थेची निवडणूक झाल्यानंतर संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगा ही निवडणूक रद्द करते असे पहिल्यांदाच घडते आहे.

panchganga-karkhana-news-panchganga-karkhana-news-panchganga-karkhana-is-a-failure-of-the-election-commissions-thinking-and-rules

याचा अर्थ पहिल्या निवडणुकीत निवडणूक आयोगाचे काम शंका घेण्यासारख होते की काय अशी चर्चा आहे. निवडणूक आयोगाने आपले काम व्यवस्थित न केल्यामुळे पुन्हा एकदा खर्चाचा भुर्दंंड सभासदांवर पडला आहे. याला जबाबदार कोण असा सवाल निर्माण होत आहे. एकंदरीत कारखान्याची निवडणूक रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक घेउन निवडणूक आयोगाने आपल्या विचारांची आणि नियमांची दिवाळखोरी जाहीर केल्याचे दिसून येत आहे.

पी. एम पाटील विरूध्द रजनी मगदूम असा सामना

कारखान्याचे विद्यमान चेअरमन पी. एम. पाटील यांच्या विरोधात रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या कन्या रजनी मगदूम उभ्या ठाकला आहेत. गेल्या निवडणुकीत पी. एम. पाटील यांनी बाजी मारली होती. आता पुन्हा एकदा पी. एम. पाटील यांनी प्रचारात रान उठवले आहे. पी. एम. पाटील यांच्या बाजूने आमदार यड्रावकरांचा पूर्ण गट प्रचारात उतरला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज