rajkiyalive

jayant patil news: साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले यांचे निधन

jayant patil news: साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले यांचे निधन: महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस,राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले (वय 74 वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते राज्यातील साखर कामगारांची पगार वाढ निश्चित करणार्‍या राज्य शासन,साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीचे सदस्य होते.

jayant patil news: साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले यांचे निधन

कासेगाव (ता.वाळवा) हे त्याचे गांव आहे. शुक्रवारी सायंकाळी फिरून आल्या नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने कराड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान त्यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर कासेगाव येथील कृष्णा नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह साखर उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली,भाऊ-चुलतभाऊ, पुतणे असा एकत्रित मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि.5 मे रोजी सकाळी 9 वाजता कासेगाव (ता.वाळवा) येथे होणार आहे.
ते गेल्या 40 वर्षापासून कामगार चळवळीत कार्यरत होते. त्यांच्यावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा पगडा होता.

jayant-patil-news-senior-leader-of-sugar-workers-shankarrao-ramchandra-bhosale-passes-away

ते माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक होते. एक शांत,संयमी,अभ्यासू, आणि संघर्षाऐवजी संवाद व समन्वयातून कामगारांना न्याय मिळवून देणारा जेष्ठ नेता हरपल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज