zp election news : जिल्हा परिषद मतदारसंघाची होणार पुनर्रचना : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालय, पंचायत समितीची निवडणूक तब्बल तीन वर्षापासून लांबणीवर पडलेली निवडणूक होईल. तत्कालीन महाविकास आघाडीने मतदारसंघाच्या पुनर्रचना करीत मतदारसंघात वाढ केली होती, आता 2011 च्या जनगणनेनुसार पुनर्रचनेची जबाबदारी राज्य सरकारला दिली आहे.
zp election news : जिल्हा परिषद मतदारसंघाची होणार पुनर्रचना
आटपाडी गट रद्द होणार, खानापूरमध्ये एक वाढणार, इच्छुकांना दिलासा
त्यामुळे महायुतीसाठी फायदेशीर असलेली जिल्हा परिषदेसाठी 60 जागांसाठीच निवडणूक होईल. आटपाडी नगरपंचायत झाल्याने तो गट रद्द होवून खानापूरमध्ये एक गट वाढणार आहे. तसेच पंचायत समितीचे 120 गण कायम राहणार असल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला.
राज्यातील महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. ही प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक अधिकार्यांची समिती नियुक्त करुन कार्यवाही करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
महापालिका आणि जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका 2020 च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत अपेक्षित होता. मात्र ओबीसी आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेचा निर्णय न झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सातत्याने लांबणीवर पडल्या. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेवू नयेत, या मागणीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार आग्रही राहिले. त्याबाबतचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
त्याच्यावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली होती. परंतू न्यायालयात प्रक्रिया सुरु असल्याने निवडणूक लांबणीवर पडली होती. आता न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
वाढती लोकसंख्या आणि वाढलेले मतदार लक्षात घेता मतदारसंघ वाढले आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे आता 68 मतदारसंघ आणि पंचायत समितीचे गण 136 होणार होते. कडेगाव आणि कवठेमहांकाळ तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यात जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढणार होता. परंतू जुन्या पुनर्रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेचे सध्या 60 गट आहेत,
जुन्या प्रभाग पुनर्रचनेनुसारच निवडणूक होणार असल्या तरी. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषद गट आणि गणांच्या पुनर्रचनेबाबत विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी जिल्हा परिषद 60 तसेच पंचायत समितीचे 120 गण कायम राहणार आहेत. आटपाडी नगरपंचायत झाल्याने तो गट रद्द होणार आहे, त्यामुळे आटपाडी तालुक्यात 3 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ राहतील, तर खानापूर तालुक्यात नव्याने एक गट वाढून 4 मतदारसंघ होतील. यापूर्वी जिल्हा परिषदेचे 68 गट गृहित धरुन आरक्षण काढण्यात आले होते, परंतू 60 मतदारसंघ झाल्यास जिल्हा परिषद गटांसाठी फेर आरक्षण काढण्यात येईल.
zp-election-news-zilla-parishad-constituency-to-be-reorganized
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसीसह घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या कारणांनी जिल्हा परिषदेतील ओबीसीच्या 16 जागा राहतील. त्यामुळे जिल्हा परिषदेतील खुल्या गटासाठी 37 जागा मिळणार आहेत. त्यामध्ये पुरुष 18 आणि खुल्या गटातील महिलांसाठी 19 जागा आरक्षित राहतील. याशिवाय सात जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहणार आहेत. महिला आरक्षण 50 टक्के राहणार असल्याने 60 पैकी 30 जागांवर महिला निवडून येतील. त्यामुळे परंपरागत असलेल्या मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
संभाव्य तालुकानिहाय जिल्हा परिषदेचे गट संख्या
तालुका गट संख्या
आटपाडी 3
जत 9
खानापूर 4
कडेगाव 4
तासगांव 6
क.महांकाळ 4
पलूस 4
वाळवा 11
शिराळा 4
मिरज 11
एकूण 60

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.