rajkiyalive

jayashri patil news : जयश्रीताईंवर जसा पक्षाने अन्याय केला तास माझ्यावर देखील व्हावा :

 

jayashri patil news : जयश्रीताईंवर जसा पक्षाने अन्याय केला तास माझ्यावर देखील व्हावा : : काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे असं जयश्रीताई पाटील यांनी म्हंटले आहे. असाच अन्याय पक्षाने माझ्यावर करावा. त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आमदार हि पदे भूषवली. आम्हालाही आमदार मंत्री व्हावे वाटते असा टोला काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांना लगावला. तसेच वसंतदादा बँकेचे वितुष्ट टाळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता सर्वसामान्यांच्या ठेवी, महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी त्यांनी परत द्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

jayashri patil news : जयश्रीताईंवर जसा पक्षाने अन्याय केला तास माझ्यावर देखील व्हावा :

काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटलांचा टोला 

जयश्रीताई पाटील यांनी कॉग्रेसला राम राम केल्यानंतर प्रथमच पृथ्वीराज पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली. पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताई यांचा भाजपा प्रवेश का झाला ? याचा खुलासा खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात केला आहे. वसंतदादा बॅँकेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच हा प्रवेश झाला असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

स्वत: जोखडातून मुक्त होताना सामान्यांनी तसेच ज्या संस्थांनी विश्वासाने बॅँकेत ठेवी ठेवल्या होत्या त्याचेही हित होणे गरजेचे आहे. त्या ठेवींची जबाबारी कोणावर ? हे देखील स्पष्ट करावे. नजीकच्या काळात बॅँकेत अडकलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळाल्यास जयश्रीताईनी केलेल्या पक्षप्रवेशाचा आनंद सर्वानाच होईल आणि एका दृष्टीने सामान्यांना न्याय मिळेल.

जयश्रीताईंच्या भाजपा प्रवेशामुळे कॉँग्रेस पक्ष खिळखिळा झाला असल्याची चर्चा काहीजण करीत आहेत.

परंतु त्यामध्ये तथ्य नाही. त्याचे उत्तर विधानसभेच्या निवडणूकीतच मिळाले आहे. वसंतदादा घराणे त्या निवडणूकीत माझ्याविरोधात मैदानात उतरले होते परंतु त्यावेळी जयश्रीताईंची अनामत रक्कम देखील जप्त झाली होती हे जनता विसरलेली नाही. सध्या कॉँग्रेस जरी राज्यात सत्तेत नसली तरी देखील महायुतीमध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आमचे अनेक मित्र मंत्रीपदी आहेत.

त्या ओळखीचा उपयोग करुन त्यांच्यामाध्यमातून विकासाची कामे करणे हेच माझे धोरण आहे.

कोणत्याही परिस्थितीत विकासकामांना खिळ बसता कामा नये या हेतूने आतापर्यत अनेक विकासकामे मंजूर करुन घेतली आहेत. दोनदा निवडणूकीत पराभव झाला असला तरी भविष्यकाळात सामान्यांच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी लढत राहणार आहे. आता मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. अद्याप आघाडीचा निर्णय झाला नसला तरी आगामी निवडणूकीत सांगली महापालिकेवर कॉँग्रेसचा झेंडा निश्चित फडकेल असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

jayashri-patil-news-just-as-the-party-did-injustice-to-jayashri-the-same-injustice-should-be-done-to-me

पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताई यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे नवीन कार्यकर्त्यांच्या दृष्टीने चांगले झाले आहे. एका दृष्टीने ताईंचा गट कॉग्रेसमधून गेल्याने कॉँग्रेसमध्ये जी स्पेस निर्माण झाली आहे ती भरुन काढण्याची संधी काम करण्यास इच्छुक असलेल्या परंतु वाव मिळत नसलेल्या नवीन कार्यकर्त्यांना मिळणार आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, जाहीर कार्यक्रमात काही ठिकाणी महायुतीचे मंत्री आणि आघाडीतील नेते एकाच व्यासपीठावर असतो. त्यावेळी खेळीमेळीत आमच्यात संवाद होतो. अशाच एका कार्यक्रमात जशी खासदार विशाल पाटील यांना भाजपाने पक्षप्रवेशाची ऑफर दिली तशीच मलाही दिली होती. परंतु आमच्या संस्थेतील सर्व व्यवहार पारदर्शी असल्याने मला कॉँग्रेस पक्ष सोडून भाजपाच जायचे काहीच कारण नाही. मी कॉँग्रेसमध्येच राहणार.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज