shakteepith nahamarg news : शक्तिपीठ’ विरोधात 1 जुलैला अंकलीला रास्ता रोको : विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर जबरदस्तीने शक्तिपीठ महामार्ग सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन शेतकर्यांना भिती दाखवली जात आहे. हे काम तातडीने रद्द करावे, या मागणीसाठी 19 गावातील बाधीत शेतकरी अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करतील, असा निर्णय शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आली.
shakteepith nahamarg news : शक्तिपीठ’ विरोधात 1 जुलैला अंकलीला रास्ता रोको
19 गावातील बाधीत शेतकरी होणार सहभागी
सांगलीत शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, प्रवीण पाटील, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, पै. विष्णुपंत पाटील, यशवंत हरगुडे, राजाराम माळी, सतीश माळी, अण्णासाहेब जमदाडे, सुरेश पाचुंबरे, अधिकराव शिंदे, रवींद्र माळी, भीमाना खाडे, एकनाथ कोळी, उत्तम शिंदे, रघुनाथ पाटील, विलास पाटील, भाऊसाहेब लांडगे, मुरलीधर निकम आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या अश्वासनाला सरकारने हारताळ फासत बारा जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणीस सुरूवात केली आहे. सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतिकार करीत आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी संवाददूत म्हणून आलेल्या अधिकर्यांना शेतकर्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत.
shakteepith-nahamarg-news-block-road-to-ankali-on-july-1-against-shaktipeeth
शेतकर्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील गावामध्ये शेतकर्यांच्या शेतीची मोजणी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्याकरिता शेतकर्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत. शेतकर्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. दि. 1 जुलै हा कृषी दिन आहे, अधिवेशन देखील या काळात आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 19 गावातील शेतकरी अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. तरी या आंदोलनात सर्व शेतकर्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.