sangli mansoon news : धरण क्षेत्रात पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ : चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चांदोली धरणाचा पाणीसाठा 28.23 टीएमसी झाला असून सलग दुसर्या दिवशी सोमवारीही 4 हजार पाचशे क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. दरम्यान जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, बहुतांशी भागात रिमझिम पाऊस झाला.
sangli mansoon news : धरण क्षेत्रात पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
शिराळ्यात जोरदार, जिल्ह्यात रिमझिम पाऊस
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासात 63 मिलीमीटर पाऊस झाला. धरणात सायंकाळी 28.23 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. चांदोलीचे चारही दरवाजे उघडले असून 4 हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. धरणात 69.05 टीएमसी पाणीसाठा झाला असून एक हजार 50 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुण्याच्या घाट परिसरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’
दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी 18.6 फुटांवर पोहोचली. कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 88.25 टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक 1 लाख 10 हजार क्युसेकने होत असून 1 लाख 11 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे.
sangli-mansoon-news-rain-in-the-dam-area-water-level-of-rivers-increases
जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शिराळा तालुक्यात बहुतांशी भागात पावसाचा जोर राहिला. वाळवा, पलूस तालुक्यात दुपारी मध्यम पाऊस झाला, मिरज, तासगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरु होती. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यात पेरण्यांना गती आल्याचे चित्र होते.
शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.6 मि.मी. पाऊस
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.6 मि. मी. पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.4 (130.5), जत 0.2 (93), खानापूर-विटा 2.9 (101.9), वाळवा-इस्लामपूर 6.3 (232.5), तासगाव 4.7 (124.6), शिराळा 27.6 (589.5), आटपाडी 0.9 (93.8), कवठेमहांकाळ 2.2 (105.6), पलूस 3.8 (189.9), कडेगाव 3.2 (155)

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.