maharashtra election news : महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे.
maharashtra election news : महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल
निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकार्यांची बैठक
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकार्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती व 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा मा. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.
1. निवडणुका घेण्यात येणार्या स्थानिक स्वराज्य संस्था
2. मतदार संख्या
3. मतदान केंद्र
4. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (एतच्)
5. आवश्यक मनुष्यबळ
6. वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबतच्या परिपत्रामध्ये माहिती तयार करून ती आयोगास झऊऋ ऋेीारीं मध्ये ई-मेलद्वारे 9 जुलै 2025 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी. तसेच उक्त नमूद सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार्या बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहावे, ही विनंती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल,असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार्या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घ्यावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले कंट्रोल युनिट , बॅलेट युनिट व मेमरी याबाबतची अद्ययावत माहिती देण्यात यावी. तसेच एका कंट्रोल युनिटवर दोन पेक्षा अधिक बॅलेट युनिट जोडणे शक्य असल्याचे विचारात घेऊन आवश्यक संख्या निश्चित करण्यात यावी.
maharashtra-election-news-elections-to-be-held-soon-in-maharashtra
एव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याची व्यवस्था, त्याचा गोडावूननिहाय तपशील. तसेच नवीन मशीन खरेदी करण्याचे प्रस्तावित असल्याने, त्याकरिता आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात उपलब्ध मास्टर ट्रेनर्स व अतिरिक्त लागणारे मास्टर ट्रेनर्स.
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा कसे? याबाबत खात्री करावी. अधिकचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास, संबंधित विभागातील विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याकरिता मागणी सादर करावी.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.