tasgaon shaktipeeth news : डोंगरसोनीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी पाडली बंद: शक्तिपीठ महामार्गाची सोमवार पासून डोंगरसोनी येथील मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यास सरकारने हरताळ फासत बारा जिल्ह्यात जमीन मोजणीस पोलीस बंदोबस्तात सुरवात केली होती.
tasgaon shaktipeeth news : डोंगरसोनीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी पाडली बंद
सरकारच्या या कृतीला महाराष्ट्रातील शेतकरी जोरदार प्रतीकार करत आहेत. सरकारच्या या कृतीच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती शेतकरी कृती समितीचे महेश खराडे यांनी माहिती दिली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
महेश खराडे पुढे म्हणाले की या अगोदर संवाद दुत म्हणुन आलेल्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावले. त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत.
शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कवठेमहांकाळ , तासगाव, मिरज तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत आप आपल्या गावातुन संवाद दुत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळवून लावले. व कोणताही संवाद न करता अधिकाऱ्यांना आल्या पावली परत फिरावे लागले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वत:चे स्वप्न पुर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणार असतील तर महाराष्ट्रातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालु देणार नाही. हे शेतकऱ्यांनी या अगोदर देखिल दाखवुन दिले आहे. आताही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. हा ईशारा आम्ही सरकारला देत आहोत.
शक्तिपीठ मुळे शेतकऱ्यांचे, शेतीचे आणी पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होणार आहे.
सांगली परिसरातील गावांना महापुराचा धोका वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे. हे सरकारला अनेक वेळा सांगुन देखील मुख्यमंत्री आणी त्यांचे सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. म्हणुन ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई जशी रस्त्यावर राहील तशी आमच्या गावात आणी शेतात राहील. त्याचा पहीला हिसका गावात आलेल्या अधिकार्यांना दाखवला आहे.
tasgaon-shaktipeeth-news-dongarsoni-shaktipeeth-highway-enumeration-closed
पुढेही दाखवु पण महामार्ग होउ देणार नाही. आमची शेती वाचवु. त्यासाठी रक्त सांडायची देखिल तयारी आमची आहे. जिल्ह्यातील १९ गावातील शेतकऱी तसेच महापुर बाधित जनता सरकारचा हा डाव उधळल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला.
यावेळी उमेश देशमुख, महेश खराडे, रवींद्र साळुंखे, गुलाब मुलाणी, नितीन झांबरे, संतोष टेसाई सचिन मांगले, रमेश झांबरे, सुदर्शन झांबरे, शरद पवार, विजय यादव,राजाराम माळी, राहुल यादव इत्यादीसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











