kabnur news : कबनूरमध्ये पाणी भरताना मोटारीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

SHARE:

kabnur news : कबनूरमध्ये पाणी भरताना मोटारीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू : पाण्याची टाकी भरताना इलेक्ट्रिक मोटारीच्या विजेचा धक्का लागल्याने येथील महिलेचा मृत्यू झाला. आशा अरुण देसाई (वय 39, रा. जयहिंद नगर, कबनूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

kabnur news : कबनूरमध्ये पाणी भरताना मोटारीचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आशा देसाई या सकाळी घरासमोरील हौदातील पाणी इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने गच्चीवरील टाकीत भरत होत्या. यावेळी मोटारीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. धक्का बसताच त्या बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. शेजारी आणि नातेवाइकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची वर्दी पती अरुण देसाई यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव निलावडे (ता.खानापूर, जिल्हा, बेळगाव) या त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *