padli crime news : पाडळी येथील बालक तीन दिवसापासून बेपत्ता: पाडळी ता. तासगांव येथील अडीच वर्षाचा शंभूराज शशिकांत पाटील शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडीलांच्या सोबत शेतात गाई आणण्यासाठी गेला असता. वडील जरा बाजूला गेले असता दहा मिनिटात शंभूराज दिसेना झाला.
padli crime news : पाडळी येथील बालक तीन दिवसापासून बेपत्ता
अपहरण की अपघात घटनास्थळी चर्चा: पोलिसा समोर आव्हान
वडिलांनी इकडे तिकडे शोधले तर दिसेना असा झाला. त्यामुळे वडिलांनी पोलिसात तक्रार दिले शनिवार रात्री पासून पोलिस गावात तळ ठोकून आहेत. पण अद्याप शोध लागला नाही. घटनास्थळी अनेक तर्क लावले जात होते .यामध्ये पाण्यात गेला असेल किंवा भक्षक प्राण्यांनी उचलून नेले असेल किंवा अघोरी कृत्य साठी अपहरण तर केले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पाडळी गावापासून एक किमी अंतरावर असणारे माळेवाडी येथे बालकांचे वडील मुलाला घेऊन जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते. पण दहा मिनिटात ज्या जागी मुलाला सोडले होते तिथे मुलगा नसल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तीन दिवसांपासून शेजारील विहिरी, ओढा येथे रेस्क्यू टीमच्या साह्याने शोध सुरू होता. तर पोलिस व वनविभागाने संपूर्ण डोंगरात शोध घेतला पण हाती कायच लागले नाही. तीन दिवसांपासून पोलिस ,सांगली व कुपवाड येथील रेस्कु टीम, गावातील तरुण शोधमोहीम करत आहेत पण हाती कायच लागले नाही. त्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.
padli-crime-news-a-child-from-padli-has-been-missing-for-three-days
यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोल, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार अतुल पाटोळे, ग्रामसेवक, राहुल गुरव, तलाठी, पोलिस पाटील आदी घटनास्थळी उपस्थित होते.
पोलिसांसमोर तपासाचे दुहेरी आव्हान
पोलिसांसमोर अपहरण की अपघात असे तपासाचे आव्हान समोर उभा राहिले आहे. पोलिस सध्या अपघात असावा हा दृष्टिकोन समोर ठेवून तपास करीत आहेत. भागातील विहिरी, ओढे, डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे. पण तीन दिवसांपासून हाती कायच लागले नाही. त्यामुळे पोलिसांना वेगळा बाजूनी ही तपास करावा लागेल अशी घटनास्थळी मोठी चर्चा होती. या गावात मोठ्या प्रमाणात अघोरी कृत्य सतत केली जात असल्याचे चर्चा आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.