varna dharan news : वारणा धरणाचे चारही दरवाजे उघडले

SHARE:

varna dharan news : वारणा धरणाचे चारही दरवाजे उघडले : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली असून सलग दिवस अतिवृष्टी सुरूच होती यामुळे धरण 83.60 टक्के भरले आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढ झाल्यामुळे परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून आज, सोमवारी दुपारी 4:30 वाजता धरणाचे चारही दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. विद्युत गृहातून 1400 तसेच दरवाज्यातून 2000 क्युसेक असा एकूण 3400 क्युसेकने विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

varna dharan news : वारणा धरणाचे चारही दरवाजे उघडले

3400 क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

7 जुलै पासून धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू होती त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. धरणात 28.66 टीएमसी पाणीसाठा झाला असून 17.46 टीएमसी एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 21.78 टीएमसी उपायुक्त पाणीसाठा झाला आहे. शुक्रवार पासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

सात दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दूर झाले आहे. तालुक्यातील 49 पैकी 45 पाझर तलाव भरले आहेत तर निगडी 80, कापरी 90, लादेवाडी 70, भाटशिरगाव 90 टक्के भरले आहेत. चांदोली धरण परिसरात 1 जून पासून 1372 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज , निवळे , धनगरवाडा व वारणा धरण परिसर या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची हजेरी असल्याने धरणामध्ये 8126 क्युसेक ने पाण्याची आवक सुरू झाली आहे.

——————–
सतर्कतेचा इशारा
वारणा धरणातून वारणा नदीपात्रात 3400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता बाबासाहेब पाटील व शाखाधिकारी सुदाम कुंभार यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *