rajkiyalive

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

दिनेशकुमार ऐतवडे

 

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची.

उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे.

हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या मतदार संघावर दावा सांगितला आहे. सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असल्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. माजी आमदार हाळवणकर आणि राहूल आवाडे हेही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राजवर्धन निंबाळकर यांची निवड लोकसभा मतदार संघावर जिल्हाध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजप काढून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघ येतात. ही दोन्ही लोकसभा मतदार संघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. आता येथे भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरून भाजपची बरीच दमछाक होणार हे नक्कीहातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये दुभागला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा ही दोन विधानसभा मतदार संघ हातकणंगले लोकसभा मतदार संघाला जोडले गेले आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदार संघात या दोन मतदार संघाचे महत्वाची भूमिका ठरणार आहे.

राजू शे्ट्टी यांनी पहिल्याची प्रयत्नात राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला.2014 च्या निवडणुकीतही राजू शेट्टी यांनी दुसर्‍या वेळीही बाजी मारली.

2009 पासून या नवीन मतदार संघाची निर्मिती झाली.

इस्लामूर आणि शिराळा हे दोन मतदार संघ कराड लोकसभा मतदार संघाला जोडले होते. नव्या रचनेत हे दोन विधानसभा मतदार संघ हातकणंगले लोकसभा मतदार संघाला जोडले गेले. शिरोळ मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या राजू शे्ट्टी यांनी पहिल्याची प्रयत्नात राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला.2014 च्या निवडणुकीतही राजू शेट्टी यांनी दुसर्‍या वेळीही बाजी मारली. बलाढ्य समजल्या जाणार्‍या काँग्रेसच्या कल्लापाण्णा आवाडे यांचा त्यांनी दारूण पराभव केला. गेल्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत मात्र धैर्यशिल माने यांनी राजू शेट्टीच्या विजया रथ रोखला.

धैर्यशील माने उध्दव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामिल

त्यानंतर गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. धैर्यशील माने उध्दव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यांनी या मतदार संघात संपर्क दौरा सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरच्या दौर्‍यावर आले असता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा आम्हीच लढविणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे धैर्यशिल माने यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित आहे. त्याच बरोबर भाजपनेही या मतदार संघावर डोळा ठेवला आहे. इचलकरंजीचे माजी आमदार हाळवणकर, राहूल आवाडे यांनी लोकसभा भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इचलकरंची विधानसभा मतदार संघावर प्रकाश आवाडेंनी मजबूत पकड निर्माण केल्यामुळे भाजपला हाळवणकरांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. त्यातच राहूल आवाडेही लोकसभेची तयारी करीत आहेत.

दोन मतदार संघातील कोणीही लोकसभेसाठी इच्छुक नाही

इस्लामपूर आणि शिराळा मतदार संघात निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांच्या रूपाने भाजपची ताकद आहे. परंतु ते दोघे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. या दोन मतदार संघातील कोणीही लोकसभेसाठी इच्छुक नाही. नुकतीच भाजपने या मतदार संघातील राजवर्धन निंबाळकर लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. भाजपची वाटचाल उमेदवारी मिळविण्याकडे सुरू आहे. भाजपने विधानसभेपेक्षा लोकसभेकडे जास्त लक्ष दिले आहे.  त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी आपल्याकडेेच घ्यायचे असा चंग भाजपने बांधला आहे. आता राष्ट्रवादीमध्येही फूट पडली आहे. अजित पवार गट भाजपच्या समवेत राहणार असल्यामुळे भाजपच्या आशा वाढल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्येही अजित पवारांचा गट असल्यामुळे त्यांचाही फायदा भाजपला होणार आहे.

भाजपची वाटचाल उमेदवारी मिळविण्याकडे सुरू आहे. भाजपने विधानसभेपेक्षा लोकसभेकडे जास्त लक्ष दिले आहे.  त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी आपल्याकडेेच घ्यायचे असा चंग भाजपने बांधला आहे.

स्वकियांचाही सामना करावा लागणार आहे.

विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना विरोधकांबरोबर  स्वकियांचाही सामना करावा लागणार आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गट, महाविकास आघाडी आणि प्रमुख विरोधक राजू शेट्टी हे विरोधात असणार आहेत. त्यात भाजपची डोकेदुखी त्यांना ठरणार आहे. आवाडे किंवा हाळवणकर यांना उमेदवारी नाही मिळाली तर त्यांचे कार्यकर्ते मनापासून काम करणार काय हे पहावे लागणार आहे.

राजू शेट्टी स्वतंत्र की महाविकास आघाडी

राजू शेट्टी यांनी सध्यातरी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. पण त्यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवली तर मतांची विभागणी होणार आहे. त्यामुळे त्यांना कुणाची तरी संगत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडे सध्यातरी तसा ताकदीचा उमेदवार नाही, भाजप शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राजू शे्टींनी जर  महाविकास आघाडीशी समझोता केला तर त्यांना थोडे सोपे जाणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज