rajkiyalive

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात

 

 

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते

 दिनेशकुमार ऐतवडे 

1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले.

मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर आधारीत प्रांतरचना झाली होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात झाला. परंतु बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात गेल्याने तेथील लोकांवर अन्याय झाला. यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण

महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली.

महाराष्ट्रात एकूण 264 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये एस.स्सीसाठी 33, अनुसुचित जातीसाठी 14 तर खुल्या जागा 217 जागा ठेवण्यात आल्या. 19 फेब्रुवारी 1962 रोजी ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मताची टक्केवारी वाढून 60.36 वर गेली. राज्यामध्ये एकूण 20 हजार 291 बूथ होते. एकूण 251 पुरुष आमदार तर 13 महिला आमदार निवडून आल्या.

जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती करण्यात आली होती.

जिल्ह्यात आठ जागांची निर्मिती करण्यात आली होती. सांगली, जत, मिरज, तासगाव, खानापूर, विटा, वाळवा आणि शिराळा हे आठ जागा. यापैकी विटा विधानसभा राखीव ठेवण्यात आला. सांगलीतून वसंतदादा पाटील यांची हॅट्रिक झाली. मिरजेतून गुंडू दशरत पाटील दुसर्‍यांदा निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते कवठेमहांकाळ मतदार संघातून निवडून आले होते. मिरजेत त्यांची आमदारकीची हॅट्रिक झाली. जतमधून तुकाराम कृष्णराव शेंडगे हे आमदार म्हणून निवडून आले.

खानापूरमधून संपतराव मानेंची एन्ट्री झाली.

तासगावमधून धोंडिराम यशवंत पाटील, खानापूरमधून संपतराव मानेंची एन्ट्री झाली. विट्याच्या संपतराव माने राखीव जागेतून भगवानराव लालासाहेब पवार हे आमदार झाले. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले राजारामबापू पाटील यांनी या निवडणुकीत वाळव्यातून बाजी मारली. शिराळ्यातून नाईक घराण्याचा उदय झाला. येथून वसंतराव आनंदराव नाईक हे आमदार म्हणून निवडून आले. जतमध्ये तुकाराम कृष्णराव शेंडगे यांनी शिवाजी रामचंद्र शेडबाळे यांचा 18904 मतांनी पराभव केला. मिरजेत जी. डी. पाटील यांनी निवृती बाबुराव कळके यांचा 33880 मतांनी पराभव केला. सांगलीत वसंतदादांनी भगवानराव सूर्यवंशींचा 38739 मतांनी पराभव करून हॅट्रीक केली.

दादांची हॅट्रिक, पण मंत्रीमंडळात नाही…

1962 च्या निवडणुकीत सांगलीतून वसंतदादा पाटील यांनी तिसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांची हॅट्रिक झाली. तासगावमध्ये धोंडिराम यशवंत पाटील यांनी क्रांतीअग्रणी जी. डी. लाड यांचा 14157 मतांनी पराभव केला. खानापूरात संपतराव माने यांनी भगवान मोरे यांचा 22880 मतांनी पराभव केला. विट्यात भगवानराव पवार यांनी विद्यमान आमदार पिराजी तायाप्पा म्हहाले यांचा 18601 मतांनी पराभव केला. वाळव्यात राजारामबापू पाटील यांनी शरद पवारांचे मेव्हणे एन.डी.पाटील यांचा 28756 मतांनी पराभव केला. शिराळ्यात वसंतराव नाईक यांनी यशवंत चंदू पाटील यांचा 23945 मतांनी पराभव केला.

राजारामबापू पाटील पहिल्याच टर्ममध्ये मंत्री मंडळात..!

महाराष्ट्र स्थापनेनंतर 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने 264 जागांपैकी 215 जागांवर विजय मिळविला. यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रीमंडळात अभ्यासू राजकारणी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या राजारामबापुंना या पहिल्याच मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. यशवंतराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. परंतु वसंतदादांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

दादांनी संधी मिळेल, असे वाटत असतानाच राजारामबापुंना संधी

या निवडणुकीत वैशिष्ट्य म्हणजे जी. डी. लाड यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. एन. डी. पाटील यांचाही पराभव झाला. राजारामबापू आणि संपतराव माने यांची दिमाखत विधानसभेत एन्ट्री झाली. आठही आमदार काँग्रेसचे असल्याने मंत्रीमंडळात दादांनी संधी मिळेल, असे वाटत असतानाच राजारामबापुंना संधी देण्यात आली. महसूल, उद्योग, वीज, नागरी पुरवठा सहकार, वन अशा अनेक खात्यांची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

7 सप्टेंबर 1966 रोजी विधीमंडळात बापुंनी जमीन महसूल विधेयक सादर

1962 मध्ये नवीन राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी कठीण होती. याच मंत्रीमंडळात 7 सप्टेंबर 1966 रोजी विधीमंडळात बापुंनी जमीन महसूल विधेयक सादर करताना लँड रेव्हेन्यू कोडमधील दुरस्त्यांची घोषणा केली. या कायद्यान्वये शेतकर्‍यांना बँकेकडून कर्ज मिळणे सोपे झाले, दुसर्‍याच्या शेतातून पाणी नेणे सोपे झाले. त्याच्या अगोदर वसंतदादांनी सांगलीमध्ये साखर कारखाना सुरू केला होता. या कालावधीपासूनच जिल्ह्यात बापू आणि दादा यांच्यात दुरावा वाढत गेला. दरम्यान, 1966 मध्ये वसंतदादांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज