rajkiyalive

जनसंवाद पदयात्रेने काँग्रेसला मिळणार बळ

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत होणार फायदा

शरद पवळ

काँग्रेसचे नेते, खा.राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढली. सुमारे साडेतीन हजार किलोमिटर पायी प्रवास केला. याचा फायदा कर्नाटक राज्याच्या लोकसभा निवडणुकीत झाला. त्याच धर्तीवर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा निघत आहे. याला देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत चालला आहे. त्यामुळे भविष्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला सामान्य जनतेचे बळ मिळणार आहे. जनसंवाद यात्रेतून सांगली, जत, मिरज, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी विधानसभेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे ही यात्रा काँग्रेसच्या फायद्याची असणार आहे.

देशात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. देशातील विखुरलेली काँग्रेस पुन्हा प्रवाहात आणणे व भाजपच्या कारभाराचा रोष जनतेपुढे मांडणे हा उद्देश यात्रेचा होता. त्यानुसार देशभर साडेतीन हजार किलोमिटरची यात्रा काढण्यात आली. याचा फायदा काँग्रेसला झाला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला.

हेही वाचा

सांगलीतील उमेदवारीचा घोळ संपला

राहुल गांधी यांच्या ‘कमबॅक’चा काँग्रेस अन् इंडियाला बुस्टरडोस

संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..

खानापूरची काँग्रेस कुणाच्याही दावणीला बांधणार नाही

वारसा असूनही… न झालेले आमदार…

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

काँग्रेसने एकहाती निवडणूक जिंकली. आता भाजप विरोधी असलेल्या पक्षांची एकत्रित मुठ बांधली जात आहे. भाजप विरोधातील पक्ष इंडिया आघाडीत सामील होऊ लागले आहेत. पूर्वी नेते, जनता भाजप विरोधात बोलत नव्हते, आता मात्र भाजपच्या विरोधातील रोष वाढत चालला आहे. शिवाय राज्यातील राजकीय भूकंप काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडत चालले आहेत. हाच धागा पकडून जिल्ह्यात आता काँगे्रसची जनसंवाद यात्रा निघत आहे.

काँग्रेसची जनसंवाद यात्रा दि. 9 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. दि. 14 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे. मिरज तालुक्यातून यात्रेला सुरवात झाली. त्याची सांगता सांगली शहरात सांगता होणार आहे. ही यात्रा मिरज, जत, आटपाडी खानापूर, कडेगाव, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव, शिराळा, वाळवा तालुक्यातून जाणार आहे. तर विटा व सांगली येथे सभा होणार आहे. विटा शहरातील सभेसाठी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सांगली देखील सभा घेण्यात येणार आहे.

मिरजेतून सुरू झालेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसचे युवा नेते, आ. डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ.विक्रमसिंह सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत.

पदयात्रेच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेत सामील झाले आहेत. नाराज असलेले काँग्रेसचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील आता रिजार्च झाले आहेत. मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या हक्काचा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाला जागा सोडण्यास आली होती. त्यामुळे काँगे्रेसला ही जागा मिळाली नाही. आता काँग्रेसने या जागेवर हक्क सांगितला आहे. मिरजेत सध्या भाजप अंतर्गत संघर्ष सुरू आहे. याचा फायदा घेण्याच्या तयारीत सध्या काँग्रेसचे नेते आहेत.

जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची जनसंवाद यात्रा पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांशी आ.विक्रमसिंह सावंत यांनी संवाद साधला. त्यांचा मतदारसंघात धावता दौराच झाला आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे. पलूस-कडेगाव, जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आ. डॉ. विश्वजीत कदम व डॉ. जितेश कदम यांनी नागरिकांशी संपर्क करणार आहेत. काँग्रेसने यावेळी खानापूर-आटपाडी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

माजी आमदार सदाशिव पाटील काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यानंतर डॉ. जितेश कदम यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधतील. तासगाव, कवठेमहांकाळ, वाळवा व शिराळा तालुक्यात काँग्रेसची ताकद अल्प आहे. मात्र तिन्ही मतदारसंघात काँग्रेसची जनसंवाद यात्रा निघणार आहे.

या माध्यमातून पुन्हा कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याची ही संधी आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा फायदा काँग्रेसला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगला होणार आहे. विखुरलेल्या काँग्रेस पक्षाला आता बळ मिळणार आहे.

जनसंवाद पदयात्रा विशाल पाटील यांच्या फायद्याची…

सांगली लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे विशाल पाटील गेल्या काही महिन्यापासून लोकसभा मतदारसंघात दौरे करत आहेत. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते सहा दिवस लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पहिला मतदारसंघात दौरा देखील या निमित्ताने होत आहे. त्यामुळे जनसंवाद यात्रा त्यांच्यासाठी फायद्याची राहणार आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज