विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नियोजित गुंफाची शिलान्यासची समडोळीत भव्य मिरवणुकीने आगमन झाले. यावेळी सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती वैभव पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, माणिक खोत, किरण पाटील, संजय सगोंडा, महाबल मुंडे, महावीर चव्हाण, संजय बेले आदी उपस्थित होते.
दिनेशकुमार ऐतवडे
(shantisagar maharaj news)
आचार्य शांतीसागर महाराज यांना समडोळीत आचार्य ही पदवी देवून 100
वर्षे पूर्ण होत आहेत.
आचार्य शांतीसागर महाराज यां ना समडोळीत आचार्य ही पदवी देवून 100 वर्षे पूर्ण होत आहेत. येथील शालिनी मळ्यात त्यांना आचार्यही पदवी देण्यात आली होती. त्याच जागेवर त्यांची पुरातन गुंफा होती. परंतु गेल्या 100 वर्षात ती नाहीशी झाली होती. याच नवीन गुंफा बांधण्यात येणार आहे. या गुंफ्यासाठी राजस्थान मकराना येथून दगड आले आहेत. ही संपूर्ण गुंफा संगमरवरी दगडात बांधण्यात येणार आहे. त्याच्या पायाचे दगड समडोळीमध्ये आले आहेत. या शिलान्यासची भव्य मिरवणूर रविवारी सकाळी येथील
बसस्थानकपासून काढण्यात आली.
समडोळी येथे चातुर्माससाठी असलेले आचार्य जिनसेन महाराज यांच्या उपस्थितीत या भव्य मिरवणुकीला सुरूवात झाली. संपूर्ण गावातून ही मिरवणूक निघून शालिनी मळा येथे मिरवणूक संपविण्यात आले. यावेळी तिन्ही मंदिर कमिटीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, श्र्रावक, श्र्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी महापौर सुरेश पाटील आणि धर्मानुरागी माणिक खोत यांनी प्रत्येकी एक लाखाची देणगी यावेळी जाहीर केली.
यावेळी माजी महापौर सुरेश पाटील आणि धर्मानुरागी माणिक खोत यांनी प्रत्येकी एक लाखाची देणगी यावेळी जाहीर केली. लवकरच या बांधकामास सुरूवात करणार असल्याची माहिती यावेळी ट्रस्टच्यावतीने देण्यात आली. आचार्य शांतीसागर महाराजांनी खंडीत झालेली मुनीपरंपरा पुन्हा सुरू केली. त्यांना समडोळीतील तत्कालिन श्र्रावक श्र्राविकांनी 1924 च्या दसर्यादिवशी भव्य कार्यक्रमात आचार्य ही पदवी दिली. संपूर्ण जैन समाजात शांतीसागर महाराज हेच प्रथमाचार्य म्हणून ओळखले जाते. शांतीसागर महाराज यांचे तीन चातुर्मास समडोळीत झाले आहेत.
शांतीसागर महाराज आणि समडोळी गावाचे नाते वेगळे होते.
शांतीसागर महाराज आणि समडोळी गावाचे नाते वेगळे होते. त्यांच्या स्मृती अखंड राहोत यासाठी शांतीसागर महाराज ज्या ठिकाणी तप करत होते. त्या शालिनी मळ्यात मोठी संगमरवरी दगडात गुंफा बांधण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण गावातून एका ट्रस्टचीही स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शालिनी कुटुंबीयांनी यासाठी जागा दान केली आहे. सर्वांच्या सहकार्याने या गुंफ्याची निर्मिती होणार आहे.
22 ऑक्टोंबर
रोजी वीर सेवा दलाच्यावतीने भव्य मॅरेथॉन रॅलीचे आयोजन
समडोळीत आचार्य शांतीसागर महाराजा आचार्य पदारोहण शताब्दी निमित्ताने वर्षभर विविध कार्याक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येणार्या दसर्यापासून या कार्यक्रमांनी सुरूवात होणार आहे. 22 ऑक्टोंबर रोजी वीर सेवा दलाच्यावतीने भव्य मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी येथील शांतीसागर को ऑप के्रडीट सोसायटीचे चेअरमन सुरेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. 24 ऑक्टोंबर दसर्यादिवशी येथील शांतीनाथ मंदिरामध्ये लक्ष दीपोत्सवाचेही आयोजना करण्यात आले आहे.
यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. येणार्या वर्षभरात शांतीसागर महाराज पुण्यतिथी, जयंती, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, भट्टारक संमेलन, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.