rajkiyalive

रिलायन्स दरोड्यातील एका संशयितास अटक

 मुख्य सूत्रधार अद्यापही पसार : उघड नावांपैकी तिसराच केला अटक.

जनप्रवास, सांगली 

तीन महिन्यापूर्वी शहरातील मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्स या दुकानावर भरदुपारी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून पंधरा ते वीस मिनीटात अक्षरश: कोट्यावधी रुपयांच्या दागिन्यांची लूट केली होती. त्यानंतर सांगलीच्या पोलिसांनी बिहारमध्ये ठाण मांडून देखील त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांनी दि. ९ सप्टें.रोजी पाटण्यातून एका युवकास दरोड्याप्रकरणी अटक केली आहे. विशेष म्हणजे याचा गुन्ह्यातील नेमका सहभाग काय? हे पोलिसांनी जाहीर केलेले नाही. त्याच्याकडून लुटीतील कोणताच मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला नाही. अंकुरप्रताप रामकुमार सिंग (वय २५, रा. तारवान, नौबातपुर, जि. पाटणा, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रिलायन्स ज्वेल्स दुकानावर नियोजनबध्दरित्या टाकण्यात आलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करीत कर्मचाऱ्यांचे हात – पाय बांधून  कोट्यावधीचे दागिने घेवून चारचाकीतून पलायन केले होते. पोलीस मुख्यालयापासून पाच मिनीटावर असलेल्या ठिकाणी दरोडा टाकून दरोडेखोरांनी कायदा – सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे काढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असली तरी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. ‘

हेही वाचा

अपघाती मृत्यू प्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कवठेमहांकाळमधील खोत टोळी दोन वर्षांसाठी तडीपार

मोटारसायकल चोरणाऱ्या तरुणाच्या  मुसक्या आवळल्या

सांगलीतील राममंदिर जवळील अपार्टमेंटमधील फ्लॅट भरदिवसा फोडला

डायल 112 मुळे संकटग्रस्तांना तात्काळ मदत

तपास चालू’ असल्याने याबाबत अधिक माहिती देता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. देशभरातील या प्रकारचे दरोडे टाकणाऱ्या तीन टोळ्या जेरबंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक टोळी महाराष्ट्रातील पुणे येथील तुरुंगात आहे. त्याचप्रमाणे बिहार आणि दिल्ली येथील तुरुंगात देखील दोन टोळ्या तुरुंगाची हवा खात आहेत. त्या टोळीतील कोणी जामिनावर अथवा शिक्षा भोगून बाहेर आले असून त्यांचा या दरोड्यात सहभाग आहे का ?  या दृष्टीनेही काही महिन्यांपूर्वी पोलिसांचा तपास सुरु होता. तुरुंगात असताना टोळीतील सदस्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या गुन्हेगारांना असे गुन्हे करण्यास प्रवृत्त केले आहे का याचीही चौकशी करण्यात येत होती.

साहजिकच तपासकामात मग्न असलेले सांगली पोलीस दरोड्याप्रकरणी मोठी कारवाई करुन लुटीतील मुद्देमाल जप्त करणार असा नागरिकांचा अंदाज होता. नुकतेच तपासाकरिता पोलिसांचे पथक दुसऱ्यांदा बिहार राज्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी अंकुरप्रताप सिंग यास दरोड्यातील संशयीत म्हणून जेरबंद केले. सिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असला तरी त्याचा रिलायन्स ज्वेल्सवर पडलेल्या दरोड्यात नेमकी भूमिका काय ही माहिती अद्यापपर्यत गुलदस्त्यातच आहे. आरोपी सिंग याने यापूर्वी बिहार आणि ओडीसा राज्यात जबरी चोरी आणि आर्म ॲक्ट सारखे गुन्हे केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी अंकुरप्रताप सिंग यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यास दहा दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा ठोठावली आहे.
दरोडा टाकणारे मुख्य संशयित प्रसारचं…

रिलायन्स ज्वेलर्स वर दरोडा टाकलेले सर्व दरोडेखोर हिंदी भाषिक होते. त्यांनी पेढीत प्रवेश केल्यानंतर हिंदीतून संवाद साधला. मात्र या पेढीचा रेकी करण्यासाठी गेल्या काही दिवासांपासून एक मराठी भाषिक येत असावा, असा अंदाज पोलिसांनी जून महिन्यात व्यक्त केला होता. तो स्थानिक असल्याचे देखील पोलिसांचे म्हणणे होते. स्थानिक गुन्हेगार अद्यापपर्यत पसार असला तरी पोलिसांनी बिहार येथून हिंदी भाषिक आरोपीस मात्र अटक केली आहे. रिलायन्स दरोड्यातील प्रमुख आरोपींची नावे पोलिसांनी पत्रकार बैठक घेवून जाहीर केली होती. त्यामध्ये गणेश उध्दव बद्रेवार (वय २४, रा. हैद्राबाद ), प्रताप अशोकसिंग राणा (वय २५, रा. वैशाली, राज्य – बिहार ), कार्तिक नंदलाल मुजुमदार (वय २३, रा. हुगळी, राज्य – पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (वय २४, रा. वैशाली, राज्य – बिहार ) या चार नावांचा समावेश होता. त्या व्यतिरिक्त एक स्थानिकाची मदत झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परंतु पोलिसांनी अटक केलेला गुन्हेगार हा नवीनच आहे. तीन महिने उलटून देखील पोलिसांनी जाहीर केलेले सर्व गुन्हेगार अद्याप मोकाटच आहेत.

———————————–

सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश देण्याच्या आमिषाने दोघांची फसवणूक

४ लाख ३५ हजारांना घातला गंडा : कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल.

महानगरपालिकेत अथवा जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तसेच डीएमएलटी शैक्षणिक अभयसक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून सांगलीतील दोघा तरुणांना दोन महिलांसह एकाने ४ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सदर फसवणुकीचा प्रकार हा दि. ३१ डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत सांगलीत घडला. या प्रकरणी फिरोज उस्मान शेख (वय ३७ रा. अभयनगर, सांगली) या तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अमृत कृष्णात शिंदे, सुनीता कृष्णात शिंदे आणि अनिता शशिकांत बोडके (सर्व रा. हुपरी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा

१८ ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून कोट्यवधीची फसवणूक

सांगलीत लिफ्टच्या बहाण्याने तरुणास लुटले

फायनान्सचे पैसे भरले नाहीत म्हणून महिलांसह चौघांना मारहाण

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी फिरोज शेख हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील अभयनगर परिसरात राहतात. विश्रामबाग परिसरातील एका मेडिकल दुकानांमध्ये ते काम करतात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरी येथील संशयित तिघांशी शेख यांची ओळख झाली होती. संशयितांनी ओळखीचा फायदा उचलत सांगली जिल्हा परिषद अथवा महानगरपालिकेत या दोन विभागांपैकी एका विभागामध्ये नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. संशयितांनी रोख आणि युपीआय द्वारे पहिल्यांदा १ लाख ८५ हजार रुपये घेतले. त्यानंतर सरकारी नोकरी न लावता टाळाटाळ करण्यास सुरवात केली

. त्याचबरोबर संकेत अण्णासाहेब गस्ते यांना सीएमएलटी व डीएमएलटी या शैक्षणिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपये घेतले मात्र त्याला प्रवेश मिळाला नाही. दोघांकडून एकूण ४ लाख ३५ हजार रुपये घेऊनही काम न झाल्याने पैसे परत देण्यासाठी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ करण्यास सुरवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिरोज शेख यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

—————————–

सांगलीत भरदिवसा विवाहितेवर चाकूने हल्ला ; तीन वार, शासकीय रुग्णालयात उपचार

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंत प्लॉट परिसरात आज दुपारी चारच्या सुमारास विवाहितेवर चाकूने हल्ला करण्यात आला. यात दीपा परशुराम चौगुले (वय २२, रा. सावंत प्लॉट) या विवाहिता जखमी झाल्या. राहुल दुर्गाप्पा पाथरवट (२१) याने हा हल्ला केल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले. दीपा यांच्यावर तीन वार झाले असून जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

इस्लामपूरात 7 कॉफी शॉपवर छापा

मतिमंद मुलीवर अत्याचार, नराधमास दहा वर्षांच्या सश्रम कारावास

बस स्थानकात चोरी करणाऱ्या सराईत महिलांच्या आवळल्या मुसक्या

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दीपा चौगुले या सावंत प्लॉट परिसरात राहतात. त्याच परिसरात राहुल हा देखील राहतो. आज दुपारी चारच्या सुमारास दोघात वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर राहुल याने चाकूने पाठीवर, पोटावर असे तीन वार केले. त्यानंतर जखमी दीपा या जखमी अवस्थेत होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अमर मोहिते, सचिन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्यांनी जखमींचा जबाब घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, विश्रामबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, मारामारीसह गुन्ह्यांची मालिकाच सुरू आहे. याच परिसरात गुंडाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यानंतर आता महिलेवर चाकू हल्ला झाला. पोलिसांचे गस्तीपथक करते काय, असा सवाल उपस्थित होतोय. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे नेटवर्क संपल्यात जमा असल्याची स्थिती असल्याचे चित्र आहे. वाढत्या गुन्हेगारीचा आलेख रोखणे आव्हान असेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज