rajkiyalive

समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श

 

संपूर्ण जैन समाज झाला एक : मान्यवरांची उपस्थिती : गावजेवणाला मोठा प्रतिसाद

मिरज तालुक्यातील समडोळी येथे अनंत चतुर्दशी अर्थात अनंत लोपीची उत्साहात सांगता झाली. येथील न्यू विजय मंडळ आणि शांतीसागर क्रेडीट सोसायटी, शांतीसागर चॅरिटेबल ट्रस्ट, महावीर जिन मंदि र, शांतीनाथ जिनमंदिर, आदीनाथ जिन मंदिर आणि जैन समाजातील विविध जैन समाजातील मंडळाच्या पुढाकाराने संपूर्ण जैन समाजासाठी पहिल्यांदाच गाव जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

जैन समाजात पर्युषण पर्वाला अनन्यसाधारण महत्व आहे. या नउ दिवसाच्या कालावधीत अनेक उपक्रम राबविले जातात. समडोळीतही तिन्ही मंदिरात महिला आणि पुरूष श्र्रावक लोपीसाठी बसले होती. त्याची सांगता शुक्रवारी झाली. या

 

निमित्ताने पहिल्यांदाच समडोळीत संपूर्ण जैन समााजासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

येथील शालिनी पाटील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, सांगलीची माजी महापौर सुरेश पाटील, बाजार समितीचे माज्ची सभापती वैभव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, किरण पाटील, महाबल मुंडे, अभय पाटील, संजय सगोंडा, एस. के. पाटील, सतीश पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमची सुरूवात झाली. सुरूवातीला आचार्य शांतीसांगर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली.

हेही वाचा

समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक

आचार्य शांतीसागर शताब्दी महोत्सव जोरदार करण्याचा संकल्प

आचार्य शांतीसागर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मिरज तालुक्यातील समडोळी येथे आचार्य शताब्दी महामहोत्सवाची तयारी करण्यात येत आहे. 1924 च्या दसर्‍या दिवशी शांतीसागर महाराज यांना समडोळी येथील शालिनी पाटील यांच्या मळ्यात संपूर्ण जैन समाजाच्यावतीने आचार्य ही पदवी देण्यात आली होती. खंडीत झालेली मुनीपरंपरा शांतीसागर महाराज यांनी सुरू केली आहे. त्या कार्यक्रमाला 2024 च्या दसर्‍याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येणार्‍या दसर्‍यापासून शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गावातील संपूर्ण जैन समाज एकत्र आले आहेत. त्यांची एक कमिटीही स्थापन करण्यात आली आहे. गावातील शांतीनाथ मंदिरालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 22 ऑक्टोेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

येथील शालिनी पाटील मळ्यात गुंफा बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. येणार्‍या वर्षभरात संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण असणार आहे. शुक्रवारच्या कार्यक्रमात संपूर्ण समाज एकत्र येउन एक चांगला संदेश समाजाला दिला आहे. केवळ चारच दिवसापूर्वी संपूर्ण समाजासाठी गाव जेवण घालण्याचे ठरले. येथील न्यू विजय मंडळ आणि शांतीसागर को ऑप क्रेंडीट सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. किरण पाटील, महाबल मुंडे, संजय सगोंडा, अभय ढंग, एस. के. पाटील यांनी विशेषत: पुढाकार घेवून कार्यक्रम यशस्वी करण्याचा विडा उचलला.

अनेकांनी मदतीच हात पुढे केला. अनेकांनी वस्तुच्या रूपात दान दिले. पण मुख्य अडचण आली ती पावसाची. येथील शालिनी पाटील मैदानावर मोठे मंडप उभारण्यात आले होते. परंतु गुरूवारी रात्री मोठा पाउस पडला. त्यामुळे कार्यक्रम होतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु शुक्रवारी सकाळी पावसानेही चांगली साथ दिली. सकाळी लवकर सर्व कार्यकर्ते एकत्र आले. संपूर्ण मैदानावर क्रशर टाकण्यात आले आणि सर्व कार्यकर्त्यांचे चेहरे चांगले फुलले.

बघता बघता संपूर्ण गाव एकत्र आले आणि 11 वाजता कार्यक्रमाला सुरूवात झाली दोन तासातच संपूर्ण समाज एकत्र येउन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजरी लावली. शुक्रवारी दिवसभर संपूर्ण गावात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू होती.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज