rajkiyalive

धैर्यशील माने अज्ञातवासात?

 

janpravas sangli local politics 8 oct 2023

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली  9850652056

आगामी लोकसभा निवडणूक भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित महायुतीतर्फे एकत्रित लढण्यिाचा निर्णय झाला आहे. राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात घर चलो अभियानाची सुरूवात केली आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात भाजपचा खासदार होणार असे ते ठणकावून सांगत आहेत. असे असले तरी महायुतीमध्ये असणार्‍या शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने अज्ञातवासात आहेत की काय अशी शंका मतदारांना येवू लागली आहे.कारण सध्या त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. मतदार संघात विकासकामे सोडाच त्यांचे दर्शन मिळणेही आता अवघड झाले आहे त्यामुळे खासदार धैर्यशील माने अज्ञातवासात आहेत की काय अशी शंका मतदार बोलून दाखवित आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कारखानदारांच्या मुळावर उठलेल्या राजू शेटटी यांना धैर्यशिल माने यांनी पराभवाची धूळ चारली. शेतकर्‍यांच्या जिवावर दोनवेळा खासदार झालेल्या राजू शेट्टी यांचा पराभव कोणीही करू शकणार नाही, असे त्यावेळी म्हटले जात होते. परंतु हे विधान तरूण तगड्या धैर्यशील माने यांनी खोडून काढले. 2009 मध्ये राजू शेट्टी यांनी निवेदिता माने यांचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा धैर्यशील माने यांनी 2019 मध्ये काढला.

ऐनवेळी हातात शिवबंधन बांधून धैर्यशील माने यांनी शिवसेनेची लोकसभेची उमेदवारी मिळवली. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि कोल्हापूरमध्ये संजय मंडलीक यांचा वारू जोरात उधळला. यामध्ये राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. याचे फळही धैर्यशील माने यांना लगेच मिळाले. शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान दिले. त्यानंतर गेल्या दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

हेही वाचा

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

शिवसेनेची छकले झाली. त्यामध्ये धैर्यशील माने यांनी सत्ताधार्‍यांच्या बाजूने म्हणजेच शिंदे गटाला हिरवा कंदील दाखवला आणि त्यामध्ये सामिल झाले. केवळ सत्तेचे राजकारण करण्यात ते यशस्वी झाले मात्र विकासकामाच्या राजकारणात ते कोसो दूर राहिले आहेत. हातकणंगले मतदार संघातील अनेक गावात निवडणूक झाल्यापासून त्यांनी दर्शनही दिले आहे. लोकसभेच्या खासदारांचा मतदार संघ भरपूर मोठा असतो परंतु त्याप्रमाणात त्यांना निधीही मिळत असतोे त्या निधीचे वाटप सर्वत्र करायचे असते परंतु र्धैयशील माने यांचा निधी इचलकरंजीच्या बाहेर गेलाच नाही.

पक्षात मानाचे स्थान मिळूनही त्यांनी पक्ष वाढविण्याचेही कोणतेच काम केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर ही दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. या दोन्ही मतदार संघात भाजप विरोधक म्हणजेच आ. मानसिंगराव नाईक आणि आ. जयंत पाटील यांची सत्ता आहे. या दोन मतदार संघात विकासकामांचा धडाका लावून मतदारांच्या मनात धैर्यशील माने यांना मानाचे स्थान मिळविता आले असते. विकास कामे राहू दे निदान लोकांच्या संपर्कात तर राहता आले असते परंतु तसे काहीच घडल्याचे दिसत नाही. खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी अवस्था कित्येक गावात झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रूकडीच्या बाळासाहेब माने घराण्याला मोठा राजकीय इतिहास आहे. काँग्रेसच्या उभारीच्या काळात माने घराण्याने काँग्रेसला मोठी साथ दिली. 1977 बाळासाहेब माने काँग्रेसचे खासदार होते. त्यांच्यानंतर निवेदीता माने यांनीही काही काळ खासदारकी भोगली. त्यानंतर इचलकरंजी मतदार संघ बदलले आणि हातकणंगले मतदार संघाची निर्मिती झाली. 2009 च्या निवडणुकीत निवेदिता माने यांना पराभवाचा धक्का बसला परंतु 2019 मध्ये पुन्हा धैर्यशील माने यांनी मतदार संघ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तरूणांना फार मोठी अपेक्षा होती. परंतु ते कोणाच्या संपर्कातच राहिले नाहीत.

आता तर धैर्यशील माने यांना तिकीट मिळविण्यापासून संघर्ष करावा लागणार आहे. कारण हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही मतदार संघात भाजपचा खासदार निवडून आणायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यामुळे माने यांना नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ऐनवेळी ते भाजपच्या चिन्हावरही ते निवडणूक लढवू शकतात. कारण गेल्या वेळी ऐनवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती.

त्यामुळे या निवडणुकीतही ऐनवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको. परंतु उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना आवाडे, हाळवणकर, सत्यजित देशमुख यांच्याशी पहिल्यांदा त्यांना दोन हात करावे लागणार आहे. राहूल आवाडे तर लोकसभेच्या रिंगणात उतरणारच असे रणशिंंग फुंकले आहे. राजू शेट्टी यांना अंगावर घेण्यासही त्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे पहिली निवडणूक त्यांना तिकीटसाठी लढावे लागणार आहे.

भाजपने ही जागा शिंदे गटाला सोडली तर धैर्यशील माने यांचे तिकीट फायनल आहे. परंतु लोकांसमोर जाताना त्यांना केंद्रीय प्रश्न घेवून जावे लागणार आहे. कारण लोकल प्रश्न तर अजून आहे तसेच आहेत. गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचे गणितही घातले गेले परंतु सध्या तशी परिस्थिती राहिली नाही. राजू शेट्टी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर रान उठविण्यास सुरूवात केली आहे. समोर कोणीही असो आपण लढणारच असा पवित्रा त्यांन घेतला आहे. इंडिया आघाडीही मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांना यंदा कडवा विराध होणार यात काही शंका नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज