rajkiyalive

हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत

dineshkumar aitawade, 9850652056

मिरज तालुक्यातील नांद्रे आणि हरिपूरमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतीची मुदत संपून बरेच दिवस झाली होती. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून येथील निवडणूक लांबली होती. सध्या तालुक्यातील या दोन मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या दोन्ही गावामध्ये पारंपरिक गटामध्येच काटा लढत लागली आहे. निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरू असून, दोन्ही गटांनी पहिल्या टप्प्यात प्रचारावर जोर दिला आहे. नांद्रेमध्ये एकास एक लढत होत असून, हरिपूरमध्ये सरपंचपदासाठी चार मातब्बर उमेदवार असून काटा लढत होत आहे.

हरिपूरमध्ये पारंपरिक बोंद्रे आणि मोहिते गटात जोरदार लढत होत आहे. येथे सरपंचपद महिलांसाठी राखीव असून, चौघे उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी गटाकडून राजश्र्री तांबवेकर, विरोधी गटाकडून शोभा मोहिते, अपक्ष कविता बोंदे्र आणि सावंत यांनी सरपंचपदासाठी अर्ज दाखल केल्याने सरपंचपदाची निवडणूक जोरदार चर्चेत आहे.

सत्ताधारी गटाकडून अरविंद तांबवेकर संगूदादा बोंद्रे पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. राजश्र्री अरविंद तांबवेकर या सरपंचपदासाठी उभ्या आहेत. या गटाकडून वॉर्ड नंबर 1 मध्ये विनायक वसंत सूर्यवंशी, सौ. सुवर्णा राजाराम आळवेकर व महेश गणपती हणबर हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर दोन मध्ये युवराज मनोहर बोंद्रे, मथुरा विजय फाकडे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर दोन मध्ये 2 जागा आहेत. येथे सुनिता मारूती शेरीकर व हरिश्चंद्र बाळू हणबर रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर चार मध्ये प्रविण दशरथ खोत, अनुपमा विकास खंडागळे व संगीता मल्हारी तांदळे हे रिंगणात आहेत.

वॉर्ड नंबर पाच मध्ये महेश दिनकर बोंद्रे, मनिषा शशिकांत कुरणे व कोमल स्वप्निल सूर्यवंशी हे निवडणूक लढवित आहेत. वॉर्ड नंबर 6 मध्ये गणपती परशराम साळुंखे, श्र्रध्दा आशिष बोेंद्रे व शर्वरी सतीश रांजणे हे निवडणूक रिंगणात आहेत.
विरोधी हरिपूर विकास आघाडी मोहिते पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मोहिते, नामदेवराव मोहिते आणि विकास मोहिते हे करीत असून, सरपंचपदासाठी अशाक मोहिते यांच्या पत्नी सौ. शोभा अशोक मोहिते या सरपंचपदासाठी उभ्या आहेत. मोहिते गटाकडून वॉर्ड नं 1 मध्ये प्रकाश वसंत कांबळे, गजानन सदाशिव जगदाळे, सौ. हेमलता कुबडगे हे रिंगनात आहेत. वॉर्ड नंतर दोन मध्ये माधुरी अमर हणबर, गणेश नामदेव मोहिते, संगीता नरसू फाकडे हे रिंगणात आहेत.

वॉर्ड नं. 3 मध्ये दोनच जागा असून, येथे चंद्रकांत दशरथ लोखंडे व सुनीता संजय जाधव हे रिंगणात आहेत. वॉर्ड नं. 4 मध्ये प्रियांका राजेश वासकर, गजानन हरि फाकडे, सौ. विणा राकेश कांबळे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 5 मध्ये अर्चना प्रदीप कुंभार, ू संजय दशरथ मोहिते व यशोदा मुकुंद बावधनकर हे रिंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक 6 मध्यें नितीन अशोक केंचे, सौ. सारिका कैलास शिंदे व कुमार गणपती शिंदे हे रिंगणात आहेत.

नांद्रेत काटा लढत

नांद्रेमध्येेेेेेेेे सत्ताधारी ग्रामविकास पॅनेल आणि विरोधी परिवर्तनमध्ये काटा लढत होत आहे. ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील व गुमट पाटील हे करीत असून, विरोधी परिर्वतन पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते सुदर्शन हेर्ले, पंचायत समिातीचे माजी उपसभापती राहूल सकळे व सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील हे करीत आहेत.

सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलकडून सरपंचपदासाठी सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे माजी चेअरमन महावीर भोरे यांच्या पत्नी सौ. पूजा महावीर भोरे या उभ्या आहेत. या पॅनेलतर्फे वाडॅ नं 1 मध्ये दोनच जागा असून, येथे सत्तार मौला मुजावर व शितलकुमार आप्पासाो कोथळे हे रिंगणात आहेत.

वॉड नं. दोन मध्ये हेमलता अरविंद वाले, आण्णासाहेब नेमगोंडा पाचोरे व विलासमती श्र्रीकांत पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 3 मध्ये दिलीप बाळासाहेब मदने, सुवर्णजित बाबासो काकडे व रंजना मिलिंद कांबळे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 4 मध्ये दिपाली रमेश साळुंखे, अमितकुमार महावीर पाटील व शालन सुभाष पाचोरे हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 5 मध्ये पल्लवी श्र्रीकांत ठाले, दादासो पासगोंडा पाटील व शफिया गुलाब मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर सहा मध्ये जगन्नाथ कृष्णा ठाले, मयुरी बिपीन चौगुले व समिना सरदार मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत.

हेही वाचा

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी साडेतीन हजार अर्ज
ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203
जिल्ह्यातील नेत्यांच्या गावामध्येच रंगणार धुमशान

विरोधी परिवर्तन पॅनेलेतर्फे वॉर्ड नंबर एक मधून राहूल सकळे यांचे बंधू शितल महावीर सकळे व सैफ दिलावर मुजावर रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर दोन मध्ये छाया हरी देशमाने, सुजाता संजय पाटील व सतिशकुमार आदगोंडा हेरले हे तीन उमेदवार उभे आहेत. वॉर्ड नंबर चार मध्ये उमेश आप्पासाहेब पाटील, पद्मश्र्री प्रशांत पाचोरे व नसीमोबी झाकीर मुल्ला हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 5 मधून अभिजित कुबेर सकळे, जनाबाई राजकुमार ऐवळे व रियाज सिकंदर कागदी हे निवडणुकीसाठी उभे आहेत. वॉर्ड नंबर सहा मधून महावीर निवृत्ती सादरे, अंजली संतोष पाचोरे व अश्विनी गणेश देसाई उभे आहेत.

नांद्रेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये काटालढत होत असून, पाटील गट विरोधात सकळे, हेर्ले आणि बाळासाहेब पाटील हे युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज