rajkiyalive

नांद्रेत सत्ताधार्‍यांची प्रचारात आघाडी

dineshkumar aitawade  9850652056

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होत असून, पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पाटील गट, ग्रामविकास पॅनेल प्रचारात आघाडी घेतली आहे. पॅनेलचे सर्व उमेदवार आणि सरपंचपदाचे उमेदवार घरोघरी जावुन चिन्हाची माहिती समजावून सांगत आहेत. सरपंचपदाचे उमेदवार भोरे पती पत्नी पायाला भिंगरी लावली असून, त्यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मिरज तालुक्यातील नांद्रे हे सर्वा त सधन गाव. गावाची लोकसंख्या 22 हजारावर असून, मतदान जवळपास 12 हजार आहे. गावात ज्येष्ठ नेते एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट आणि स्व. महावीर पाटील गटाचे अमित पाटील एकत्र आले आहेत. पाटील गटाला लोकसेवेचा आणि सहकाराचा मोठा वारसा आहे. याच पाटील गटाने गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षापूर्वीच सोडविला आहे. पाटील गट अपवाद वगळता गेल्या कित्येक वर्षापासून सत्तेत आहे.

गावचा मुख्य व्यवसाय शेती आणि दूध धंदा असून, पाटील गटाच्या अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. एन. एस. पाटील, महावीर पाटील यांनी यापूर्वी जिल्ह्याच्या मोठ मोठ्या संस्थेत चांगले काम केले आहे. राजगोंडा पाटील यांनीही सरपंचप

दाची कारकिर्द गा

जवली होती. त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावात अनेक विकासाभिमुक कामे झाली आहेत.
पाटील गटाने महावीर भोरे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात सरपंचपदाची उमेदवारी दिली आहे. महावीर भोरे यांनी या अगोरदही विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून चांगले काम केले आहे.

त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांना मानणारा गावात मोठा युवावर्ग आहे. त्यांनी आपल्या पॅनेलसाठी पायाला भिंगरी लावली असून, पॅनेलचे महत्व घराघरात जावून सांगत आहेत. ग्रामविकास पॅने

लने पहिल्या टप्प्यात प्रचारावर जोर दिला आहे. सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने चांगले आणि उच्चशिक्षित उमेदवार दिले आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट व अमित पाटील हे करीत आहेत.

सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलकडून सरपंचपदासाठी सौ. पूजा महावीर भोरे यांना संधी दिली आहे. या पॅनेलतर्फे वाडॅ नं 1 मध्ये सत्तार मौला मुजावर व शितलकुमार आप्पासाो कोथळे हे रिंगणात आहेत. वॉड नं. दोन मध्ये हेमलता अरविंद वाले, आण्णासाहेब नेमगोंडा पाचोरे व विलासमती श्र्रीकांत पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा

हरिपूर, नांद्रेमध्ये काटा लढत
जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी विक्रमी साडेतीन हजार अर्ज
ग्रामपंचायतीची जागा एक अन् अर्ज आले 203
जिल्ह्यातील नेत्यांच्या गावामध्येच रंगणार धुमशान

वॉर्ड नंबर 3 मध्ये दिलीप बाळासाहेब मदने, सुवर्णजित बाबासो काकडे व रंजना मिलिंद कांबळे हे रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 4 मध्ये दिपाली रमेश साळुंखे, अमितकुमार महावीर पाटील व शालन सुभाष पाचोरे हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर 5 मध्ये पल्लवी श्र्रीकांत ठाले, दादासो पासगोंडा पाटील व शफिया गुलाब मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. वॉर्ड नंबर सहा मध्ये जगन्नाथ कृष्णा ठाले, मयुरी बिपीन चौगुले व समिना सरदार मुल्ला हे निवडणूक रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात सत्ताधारी ग्रामविकास पॅनेलने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज