rajkiyalive

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा निवडीपूर्वीच गाजवावा

पालकमंत्र्यांकडून प्राथमिक यादी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर

 

जनप्रवास : प्रतिनिधी

सांगली : जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीची प्रक्रिया माहिती करून न घेताच काहींनी आपली निवड झाली म्हणून गाजवावा सुरु केल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी काही जणांची प्राथमिक यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाकडे दिली. त्यानुसार या विभागाने संबंधितांना कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्र पाठवले. ते पत्र म्हणजे आपली निवड झाली, असे समजून पाठ थोपटून घेत असल्याचे दिसून आले.

 

जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीची प्रक्रिया मोठी आहे. या समितीवर पालकमंत्री आपल्या जवळच्या लोकांची भरती करतात. याआधीही तसेच घडायचे. आताही तेच घडते आहे. सध्या पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही आपल्या पक्षाचे, सहयोगी पक्षाचे, जवळचे सगळे लोक त्यात घेण्याची नियोजन केले आहे. त्यासाठी एक यादी नियोजन समितीकडे पाठवलेली आहे. त्या लोकांना कागदपत्रे सादर करावीत, अशी मागणी नियोजन समितीने पत्राव्दारे केली आहे. हे पत्र म्हणजे आपली निवड निश्चित झाली, असे समजून समाज माध्यमांवर फुलांचा वर्षाव सुरु झाला आहे.

पालकमंत्र्यांनी दिलेल्या यादीनुसार कागदपत्रे सादर होतील, त्यात पक्षांतर्गत, सहयोगी पक्षांतून काही नाराजीचे सूर येतील आणि यादीत बदलही घडतील, असे होत असते. त्यानंतर अंतिम यादी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे सादर केली जाते. तेथून तिला मंजूरी मिळते आणि मग समिती अंतिम होते. आता ही प्रक्रिया समजून घेण्याची गरज कदाचित भावी डीपीसी सदस्यांना वाटली नसावी, असेच चित्र मंगळवारी होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज