दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
गेल्या दीड महिन्यापासून मागील उसाला 400 रूपये आणि येणार्या गळीत हंगामातील उसाला 3500 हजार दर मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे फ्रंटफूटवर आले आहेत. गेल्या 22 वर्षापासून सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनानी यंदा चांगलीच गती घेतली आहे. शेतकर्यांनीही त्यांना कधी नव्हे ती चांगली साथ दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजून तोडी सुरू झाल्या नाहीत.
या आंदोलनमुळे साखर सम्राट धास्तावले असून, येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद नक्की उमटल्याशिवाय राहणार नाही. 2009 आणि 2014 मध्ये खासदारकी पटकावून राजू शेट्टी शेतकर्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांनी त्यांच्या विजयाचा वारू रोखला. परंतु राजू शेट्टी यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. यंदा तर त्यांनी आंदोलनाची धार जास्तच तेज केली.
उस परिषदेचे 22 वर्षे असल्यामुळे त्यांनी 22 दिवस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून पदयात्रा काढून शेतकर्यांना जागे केले. अगोदरच मराठा आरक्षणामुळे धास्तावलेले नेते मंडळी राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे आणखीनच अडचणीत आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाला केवळ 2800 ते 2900 रूपये इतकेच बिल दिले आहे. सांगली जिल्ह्यातील बर्याच कारखानदारांनी मात्र 3100 च्या आसपास बिल दिले आहे. हाच धागा पकडून राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील त्या पाच कारखान्यांविरोधात जोरदार रणशिंग फुंकले आहे. त्याचा त्यांना फायदा होताना दिसत आहे. ऐन दिवाळीत शेतकर्यांना खर्डा भाकरीवर समाधान मानावे लागले.
कधी नव्हे ती यंदा शेतकर्यांची दिवाळी काळी झाली. त्यामुळे शेतकरीही पेटून उठला आहे. कोणत्याही परिस्थितीत दर घ्यायचाच हाच निर्धार शेतकर्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी तन, मन , धनाने राजू शेट्टींच्या मागे उभे राहिल्याचे दिसून येत आहे. मार्च, एप्रिलमध्ये कधीही निवडणुका लागू शकतात. राजू शेट्टींनी रान चांगले तयार करून ठेवले आहे. कारखानदारांबद्दल तीव्र नाराजी शेतकर्यांमध्ये आहे.
हेही वाचा
..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही.
शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ
लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू
शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव
शेतकरी संघटनांना फुटीचा शाप
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य
त्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी सध्या फ्रंटफूटवर आल्याचे दिसून येत आहे. इतर कोणत्याही शेतकरी संघटनेचे नेते अजूनही घरात बसून आहेत. काही नेते राज्यकर्त्यांच्या कळपात असल्यामुळे मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



