rajkiyalive

वादामुळे कोयनेचे पाणी उन्हाळ्यात मिळणार का?

(SANGLI ) रब्बी, उन्हाळी पिकांसाठी हवे 11 टीएमसी पाणी, जलसंपदा विभाग म्हणतो, अद्याप मागणीच नाही

जनप्रवास । अनिल कदम

सांगली : यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे रब्बीचे आवर्तन कालवा समिती सल्लागार बैठकीप्रमाणे 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचे निर्देश होते. रब्बी हंगापरंतू अद्यापही योजना सुरु करण्याच्या हालचाली झाल्या नाहीत, कोयना धरणातून पाणी सोडण्याचा वाद सुरु असल्याने ही योजना वेळेत सुरु होण्याबाबत साशंकता आहे. जलसंपदा विभागाकडून सध्या मागणी नसल्याची कारणे दिली जात आहेत. टेंभूच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी 11 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. भर उन्हाळ्यात पिकांना पाणी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

32 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन आणि खासगी सिंचन योजनांसाठी राखीव 

कोयना धरणातील 32 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यातील उपसा सिंचन आणि खासगी सिंचन योजनांसाठी राखीव आहे. वास्तविक सांगली पाटबंधारे विभागाने मागणी करायची आणि कोयनेतून ते सोडायचे, असेच अपेक्षित आहे. परंतु कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यासाठी साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई खोडा घालत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. कोयना धरणातील 35 टीएमसी पाणी पूर्वेकडील योजनांसाठी राखीव ठेवण्याचे पहिले नियोजन आहे. त्यातील 3 टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यासाठी आहे. उर्वरित 32 टीएमसी पाण्याचा हक्क सांगली जिल्ह्याचा आहे.

मोठ्या शहरांसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून

जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्ष, ऊस, भाजीपाला शेतीसह सांगली, कुपवाड, इस्लामपूर, आष्टा, पलूस, कडेगाव या मोठ्या शहरांसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सोडावे यासाठी जिल्ह्यात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये पाणी वाटपाचे धोरण ठरले. पहिल्या टप्प्यात दोन टीएमसी पाणी सोडले. त्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती केल्याने पुन्हा दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे 2 टीएमसी पाण्याची मागणी केली होती.

सांगलीत दोन महिन्यांपूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

यामध्ये दि. 15 डिसेंबरपासून टेंभूचे रब्बीसाठी आवर्तन सुरु करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ही योजना सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापूर्वी ताकारी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरु झाले. सांगली पाटबंधारे विभाग कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. पण धरणातून पाणी सोडले जात नाही. पंरतू कोयना धरणातून पाणी सोडण्यावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. त्यामुळे ताकारी योजना सुरु असलेली बंद करावी लागली. त्यानंतर पंधरा दिवसानंतर कोयनेतून पाणी सोडल्यानंतर पुन्हा ताकारी योजना सुरु करावी लागली.

 

 

http://rajkiyalive.com/sangli-jilhyat-1…sanjaykaka-patil/
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

टेंभू उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी अद्यापही हालचाली सुरु झाल्या नसल्याचे चित्र 

टेंभू योजनेसाठी प्रत्येक महिन्याला दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. रब्बी आणि उन्हाळी या दोन्ही हंगामातील आवर्तनासाठी सुमारे 11 टीएमसीची आवश्यकता आहे. रब्बीचे आवर्तन सुरु केले की उन्हाळी हंगामातील सर्वच आवर्तने सलग सुरु ठेवले जाणार आहे. कोयना धरणातून पाणी सोडले तरच टेंभूचे आवर्तन सुरु होण्यास मदत होईल. टेंभूचे दोन्ही आवर्तनसाठा सुमारे 11 टीएमसी पाणी हवे आहे. कोयना धरणातून पाणी वेळेत कृष्णा नदीत सोडणार का? आणि टेंभूचे आवर्तन वेळेत सुरु होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

कोयना धरणातील पाण्याचे नियोजन
सध्याचे कोयनेतून पाणी – 82 टीएमसी
सिंचन योजनांसाठी पाणी – 34 टीएमसी
विद्युत निर्मितीसाठी पाणी – 33 टीएमसी
जून-जुलैसाठी राखीव – 15 टीएमसी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज