खासदार मुन्ना झाले हसन मुश्रीफांचे सारथी

SHARE:

कोल्हापूरच्या राजकारणात नवीन गट्टी,

कोल्हापूर : राज्यात सलग दोन वर्ष झालेल्या राजकीय भूकंपानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे धक्के जाणवले. त्यामुळे राजकारणाची पार खिचडी होऊन गेली आहे. जिल्ह्याच्या मुश्रीफ आणि बंटी पाटील या जोडगोळीच्या वाटा आता स्वतंत्र झाल्याने नवीन गट्टी आता जमू लागली आहे.भाजप खासदार धनंजय महाडिक आता वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले आहे.

 

 

 

जिल्हा पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज (25 डिसेंबर) धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसले होते. त्यामुळे या नव्या जोडगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली. काल (24 डिसेंबर) हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती. त्याच्या दुसर्‍या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार होत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला.

निधीची मागणी महायुतीतील घटक पक्षांनी कळवावी

दुसरीकडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी रविवारी महायुतीमधील पक्षांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हीही लागू शकते, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांतच कामाच्या यादीसह निधीची मागणी महायुतीतील घटक पक्षांनी कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. नियोजन समितीतून मिळणार्‍या निधीपैकी प्रत्येकी 30 टक्के निधी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाला देण्याचा फॉर्म्युला यापूर्वीच निश्चित झाला आहे.

उर्वरित दहा टक्के निधी नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री यांना द्यावा लागतो. पक्षांना मिळणार्‍या निधीपैकी काही निधी त्या पक्षासोबत काम करणार्‍या सहयोगी पक्षांना द्यावेत असा फॉर्म्युला यापूर्वीच निश्चित झाला आहे. या फॉर्म्युलानुसारच प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.

 

 

 

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीला भाजप खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, शिवसेना शिंदे गटाचे रवि माने उपस्थित होते.

निधी कमी आहे, तो वाढवण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत काही कामांसाठी निधी कमी आहे, तो वाढवण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. शाळांसाठी निधी कमी आहे, ज्या विभागाचा निधी अखर्चित होण्याची शक्यता आहे, तो निधी शाळांसाठी किंवा अन्य कमी निधीच्या विभागाकडे वळवण्यात यावा, अशीही मागणी बैठकीत झाली. यावेळी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.

हेही वाचा
भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन
दूधगंगेतून पाणी देण्यास विरोध कायम
माझ्यावर कधी पेपर फाडण्याची, काच फोडण्याची, फोन बंद करण्याची वेळ आली नाही,

अनेक पोल येऊन गेले, पण नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणी अडवू शकत नाही

आजपर्यंत निवडणुका संदर्भात अनेक पोल येऊन गेलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात तो हे आपण पाहिलेलं आहे, 2024 मध्ये मोदींना कोणी आडवू शकणार नाही, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या जनमत चाचणीत राज्यात महायुती सरकारला तगडा हादरा बसण्याचा अंदाज सी व्होटरच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी विस्कळीत दिसत असतानाही एक प्रकारे बुस्टर डोस मिळेल, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी दावा केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेलाही हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारने प्रचंड निर्णय घेतले आहेत. विरोधकांचे काम आहे टीका करणे मात्र आम्ही काम करत राहू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

प्रोत्साहनपर अनुदानावर काय म्हणाले?

एकावर्षी दोनवेळा पीक कर्ज घेतलं आहे ही तांत्रिक बाब आली आहे मात्र सर्वांना मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पात्र-अपात्र ठरलेल्या सर्वांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, असेही ते म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *