rajkiyalive

SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गेट

SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गेट

जनप्रवास । अनिल कदम

SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गेट : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून पोहोचल्याने राजकीय घडामोडी वाढत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोमात तयारी सुरु असताना खासदार संजयकाका पाटील आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विकासकामांचा आढावा घेणार आहेत. महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरु असल्याने पदाधिकारी व नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबला आहे. याचा फायदा घेत आता भाजपने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गेट

विकासकामांच्या माध्यमातून खासदार पाटील हे लोकसभेची तर पालकमंत्री खाडे यांच्याकडून मिरज विधानसभा मतदारसंघाची तयारी करीत आहेत. दोन्ही नेत्यांनी महापालिकेच्या माध्यमातून उर्वरित कामांचा सपाटा लावून प्रत्यक्षात निवडणुकीचे टार्गेट निश्चित केल्याचे दिसून येते.

पक्षाचा आत्मविश्वास आणखी बळावला आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेची निवडणूक भाजपने जिंकल्यानंतर पक्षाचा आत्मविश्वास आणखी बळावला आहे. भाजपला अच्छे दिन असल्याने आगामी निवडणुकांची भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे. असे असले तरी विद्यमान खा. संजयकाका यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी आहे. निवडणुकीच्या तापणार्‍या राजकीय वातावरणात सगळेच पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

 

या जागेसाठी भाजपमध्येच चढाओढ सुरु झाली आहे.

भाजपची जागा निश्चित असली तरी या जागेसाठी भाजपमध्येच चढाओढ सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर खा. संजयकाका पाटील विकासकामांसाठी अधिकच आक्रमक झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून कामांचा सपाटा लावला आहेच. केंद्रिय मंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. सलगरे लॉजिस्टिक पार्क मंजुरीसह आणि जिल्ह्यातील वाहतुकीच्या मार्गाबद्दल थेट नितीन गडकरी यांची भेट घेतली. याशिवाय रेल्वे मार्ग, म्हैसाळ योजनेची विस्तारित मंजुरीसह कोयनेतून सांगली जिल्ह्याला पाणी सोडण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक सन 2018 मध्ये झाली होती.

सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामाई जवळील रेल्वे पूल अचानक बंद करण्याबाबतचे पत्र रेल्वे विभागाने दिल्याने अधिकार्‍यांची खरडपट्टी केली. अचानक मार्ग बंद करणे उचित नसल्याचे सांगत लोक अंगावर धावून येतील, असेही बजावले होते. कोणत्याही परिस्थितीत तात्काळ रेल्वे पूल बंद न करता पर्याय सुचविण्याचे आदेश खासदारांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्रश्न हाताळत असताना खासदारांनी आपला मोर्चा सर्वाधिक शहराचे सर्वाधिक मतदान असलेल्या महानगरपालिकेकडे वळविला आहे. महापालिका क्षेत्रात सध्या प्रलंबित असलेल्या योजना व नव्याने आखलेल्या योजनांना गती देण्यासाठी भाजपचे आमदार, खासदार मनपात लक्ष घालणार आहेत. महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक सन 2018 मध्ये झाली होती.

 

या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती.

पण अडीच वर्षानंतर महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपमधील काही नगरसेवकांनी पक्षाशी गद्दारी करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांची मुदत ऑगस्टमध्ये संपली आहे.
मागील चार महिन्यापासून महापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. आयुक्त सुनील पवार यांच्याकडे प्रशासकांची सूत्रे आहेत.

महापालिकेच्या निवडणुका किमान सहा महिने तर होणार नाहीत.

त्यामुळे भाजपने आता महापालिकेत लक्ष घालण्यात सुरूवात केली आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचा फायदा भाजपचे आमदार व खासदार घेणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मनपा क्षेत्रात विविध योजना सुरू आहेत. या योजनांसाठी निधी आवश्यक आहे. शिवाय नव्याने राबविण्यात येणार्‍या योजनांना देखील निधी आवश्यक आहे.

 

 

त्यासाठी आता पदाधिकार्‍यांऐवजी आमदार व खासदारांना पाठपुरावा करावा लागणार आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात खासदार संजयकाका पाटील, मिरजेचे आमदार व पालकमंत्री डॉ. खाडे, आणि सांगलीचे आ. सुधीर गाडगीळ हे येतात. या सर्वांनीच महापालिकेच्या कारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. चार दिवसांपूर्वी पालकमंत्री खाडे यांची बदली कामगारांनी भेट घेतली होती. मनपाकडून राबविण्यात येणार्‍या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना कायम करावे, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय मनपा क्षेत्रातील अनेक प्रलंबित कामे आहेत. याबाबत त्यांनी बैठक घेवून अधिकार्‍यांशी चर्चा केली. ते पुन्हा विकासकामांसाठी बैठक घेणार आहेत.

खासदार पाटील देखील सोमवारी महापालिकेत लक्ष घालणार आहेत.

महापालिका क्षेत्रात खासदारांचा गट नसला तरी बहुतांशी माजी नगरसेवक त्यांच्या संपर्कात असतात. आता पदाधिकारी आणि नगरसेवक नसल्याने त्यांचा हस्तक्षेप थांबला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय नव्याने निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महापालिकेच्या योजनांना गती मिळावी व शासनस्तरावरील प्रस्तावांचा पाठपुरावा व्हावा, यासाठी खासदार सरसावले असल्याचे चित्र दिसून येते.

महापालिकेच्या निधीसाठी आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडून प्रयत्न

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी चार वर्षात 2 हजार 650 कोटीची विकासकामे मंजूर केली आहेत. त्यामध्ये सांगली महापालिकेसाठी कोट्यवधीच्या निधीचा समावेश आहे. शहरातील रस्त्यांसह अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रलंबित शेरी नाल्यास 60 निधी मंजूर केला आहे. मलनिस्सारण प्रकल्पास 253 कोटी, सांगलीत अत्याधुनिक नाट्यगृहासाठी 25 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे आ. गाडगीळ हे महापालिकेला अधिकाधिक निधी देवून विकासकामे करीत असल्याचे दिसते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज