rajkiyalive

SANGLI LOKSABHA :पळणारा नाही; त्यांची उमेदवारी कुठे निश्चित

SANGLI LOKSABHA :पळणारा नाही; त्यांची उमेदवारी कुठे निश्चित विशाल पाटील यांचा खासदार संजयकाका पाटील यांना टोला

 

 

SANGLI LOKSABHA :पळणारा नाही; त्यांची उमेदवारी कुठे निश्चित

जनप्रवास : सांगली

SANGLI LOKSABHA :पळणारा नाही; त्यांची उमेदवारी कुठे निश्चित : मी मैदानातून पळणारा नाही. पण खासदार संजयकाका पाटील यांची त्यांच्या पक्षातून तर उमेदवारी कुठे निश्चित आहे हे त्यांनाही माहीत आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढू नये असे आव्हान दिले होते. त्याचा त्यांनी समाचार घेतला.
विशाल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली होती.

संजयकाका पाटील यांनी नुकतीच पत्रकार बैठकीद्वारे विशाल पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यांनी सर्व्हेत आघाडीची नौटकंकी करू नये. लोकांत जावून काम करावे लागते. मैदान तापले की अंगाला तेल लावायचे होत नाही, त्यांनी मैदानातून पळ काढू नये असाही आरोप केला होता. त्याबाबत विशाल पाटील यांनीही प्रत्त्युत्तर दिले.

 

उमेदवारी कोणाला हे माझ्यासह कोणाच पक्षाचे निश्चित नाही.

पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे मैदान अजून तापलेले नाही. अजून महायुती असो वा महाविकास आघाडी अजून त्यांच्या जागा निश्चिती झालेल्या नाहीत. शिवाय उमेदवारी कोणाला हे माझ्यासह कोणाच पक्षाचे निश्चित नाही. संजयकाकांना त्यांच्याच पक्षातून होत आहे हे उघड आहे. असे असताना मी मैदानातून मला पळ काढू नये म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. संजयकाकांनाही त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळणार की नाही हे माहीत आहे. त्यांनी एवढे ‘सिरीयस’ व्हायला नको होते. ते कधीच एवढे आक्रमक होत नाहीत. पण आता अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आता पुत्राच्या माध्यमातून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये केंद्रीत केले आहे.

हेही वाचा

 SANGLI LOKSABHA : काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास

उमेदवारी डावलली गेल्यास विधानसभा निवडणुकीसाठीक कसे पात्र ठरू शकतील.

ते म्हणाले, लोकसभा उमेदवारीसाठी दावेदारी करीत त्यांनी बहुतेक तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे असे वाटते. पण दोनवेळा खासदार होऊनही उमेदवारी डावलली गेल्यास विधानसभा निवडणुकीसाठीक कसे पात्र ठरू शकतील. शिवाय खासदारकीनंतर विधानसभा निवडणूक लढणे कितपत योग्य ठरेल?

 

 

भाजपकडून कोणीही उमेदवार असू शकते…!

एका कार्यक्रमात पृथ्वीराज देशमुख, पाटील एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी विशाल पाटील यांचा पृथ्वीराज देशमुख यांचा विरोधक नव्हे तर प्रतिस्पर्धी असा उल्लेख केला. भाजपकडून संजयकाकाच काय, पृथ्वीराज देशमुख, डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी असू शकते असे ते म्हणाले. पुन्हा आमदार सुधीर गाडगीळही उमेदवार असू शकतात असेही ते म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज