rajkiyalive

SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद

SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद

SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद लोकसभेला एकत्र, पण विधानसभेला एकमेकांना आव्हाने

SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद

 

 

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील घटक पक्षांचे राज्यभर एकत्रित मेळावे होत आहेत. सांगली जिल्ह्यात देखील रविवारी मेळावा झाला. मात्र या मेळाव्यातील महायुतीमधील अनेक नेत्यांमधील अंतर्गत असलेली नाराजी व्यासपीठावरून बोलून दाखवली. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. तर आ. अनिल बाबर, आ. गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी लोकसभेला एकी करण्याचा नारा देखील दिला पण विधानसभेला बघू, असे आव्हान देखील दिले.

लोकसभा निवडणुकीसाठी दीड महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपने देशात 400 प्लस तर राज्यात 45 प्लसचा नारा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा मेळावा घेत वातावरण निर्मिती केली जात आहे. त्यासाठी पालकतत्व म्हणून नेमणूक देखील झाली आहे. सांगली जिल्ह्यात रविवारी हा मेळावा जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात अनेकांनी महायुतीमधील असलेला अंतर्गत संघर्षावर नाराजी व्यक्त केली.

 

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, निवडणुका आल्या की घटकपक्षांची आठवण येते.

त्यांना बोलावले जाते. पण इतरवेळा त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. रानात तण आले की हातात खुरपी घेऊन तण काढायले आम्ही लागतो. पण पिके मोठी झाली की तण काढाणारा उपाशी राहतो, हे होता कामा नये. घटक पक्षांची अपेक्षा असते, जिल्हाध्यक्षांची कामे मार्गी लागावीत. जिल्हा नियोजन समितीमधून पाच-दहा लाखांची कामे व्हावीत. पण याक डे मात्र दुर्लक्ष केले जाते. निधी संप ल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे समितीचे पदाधिकारी नेमताना विश्वासात घेतले जात नाही.

आम्ही बारीक असलो तरी आमच्याकडे दुर्लक्ष करू नका.

संजय गांधी निराधार योजनेच्या समितीत एका सदस्याची नेमणूक व्हावी, अशी मागणी झाली होती. यामध्ये एका सदस्याला संधी देणे शक्य होते. राज्याचे अध्यक्षपद मागितले नव्हते. तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्ही बारीक असलो तरी आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. आम्हाला बरोबर घेऊन चला. मुंबईतील बैठकीमध्ये देखील नाराजी व्यक्त केली आहे. लग्नाचा सिझर आला की बँडवाल्याला बोलावतात. तसे आम्ही आहोत काय? महायुतीत आम्ही आहे. त्यामुळे आमचा अपमान करू नका. मुंगी सुध्दा हत्तीचा पराभव करू शकते, हे विसरू नका, असा इशारा देखील त्यांनी बोलताना दिला.

 

व्यासपीठावर खर्ची देखील व्यवस्थित मिळाली नाही, ती पण अवघडल्यासारखी आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी

चे (अजितदादा गट) जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महायुतीत आम्ही नवीन आलो आहे. पण अवघडल्यासारखे वाटले. व्यासपीठावर खर्ची देखील व्यवस्थित मिळाली नाही, ती पण अवघडल्यासारखी आहे. जरा लेट आलो पण थेट आलो आहे. या मेळाव्यास काहीजण शरीराने आले

. मात्र मनाने नाही. विधानसभेला आमचे मतभेद आहेत. कोणाला मागे सारत कोणाला तर पुढे जावे लागले, काहींचा संघर्ष मोठा आहे. पण लोकसभेला एकत्र काम करू. स्थानिक प्रश्न व निवडणुकांमध्ये आम्ही बघू, असा इशाराच त्यांनी प्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीत दिला.

आ. अनिल बाबर म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

शिवसेना शक्तीने काम करेल, आतून-बाहेरून अस काय करणार नाही. शिवाय दुरूस्ती करू, अशी बोलायची संधी देखील आम्ही देणार नाही. मतभेद काहीही असो पण लोकसभा झाल्यानंतर बघू, असा इशारा देखील त्यांनी दिला. आ. गोपीचंद पडळकर यांनी देखील एकमेकांचे पटत नसेल तर राहूदे पण लोकसभेला एकत्र येऊ आणि मतभेद असतील तर विधानसभेला पाहू, असे म्हणले.

 

हेही वाचा
SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी
PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन
SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?
भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी
भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये
हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी
फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही
सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

 

माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी मात्र पॅचअप केले.

ते म्हणाले, महायुतीतील घटक पक्षांच्या काही अडचणी असतील तर त्या व्यासपीठावर न मांडता नेत्यांना बोलणे आवश्यक आहे. अडचणी कळाल्याशिवाय सोडवू शकणार नाही. यापुढे अशा अडचणी होऊ नयेत म्हणून मुंबईच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षाच्या सदस्यांची समिती नेमू, असे सांगत पॅचअप केले.

कोण काय म्हणाले….

* सदाभाऊ खोत- महायुतीत आम्ही फक्त बँडवाले, जिल्हा नियोजन समितीमधील निधी, संजय गांधी योजनेच्या सदस्यपदावरून लहान पक्षांवर अन्याय
* गोपीचंद पडळकर- विधानसभेला बघू काय ते पण लोकसभेला एकत्रित काम करू.
* वैभव पाटील- लेट आलोय पण थेट आलोय अवघडल्यासारखे वाटू नेऊ नका. योग्य सन्मान करा
* अनिल बाबर- लोकसभेपर्यंत मतभेद दूर ठेऊ, शिवेसना चुकणार नाही. विधानसभेला काय असेल ते पाहू

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज