उपमुख्यमंत्री अजितदादांनी हात झटकले
ajit pawar news : शेतकर्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी दिले नाही; : कोल्हापूर: महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकर्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
ajit pawar news : शेतकर्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी दिले नाही;
यासंदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकर्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकर्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाही, असं म्हणत एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अजित पवार यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकर्यांमध्ये रोज असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
ajit-pawar-news-i-did-not-promise-loan-waiver-for-farmers
महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं होतं. दरम्यान, लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भाने अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की लाडक्या बहिणी योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदित्य तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.