rajkiyalive

1967 : आप्पासाहेब बिरनाळेंना लॉटरी

 

 

POLITICAL : 1966 मध्ये वसंतदादा पाटील यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका लढविण्यात आ ल्या. 270 पैकी 203 जागा यावेळी काँग्रेसने जिंकल्या.

दिनेशकुमार ऐतवडे
‘वसंतदादा पाटील त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात आल्या.’

महाराष्ट्र राज्याची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक. गेल्या निवडणुकीत 6 जागांची भर घालून यावेळी एकूण 270 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात आली. 21 फेब्रुवारी 1967 रोजी या निवडणुका घेण्यात आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंतदादा पाटील हे असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका लढविण्यात आल्या. दादांनी सांगलीमध्ये ज्येष्ठ नेते आप्पासाहेब बिरनाळे यांना काँग्रेसमधून संधी दिली. याही निवडणुकीत सांगली जिल्ह्याला आठ जागा वाटणीला आल्या.

हेही वाचा

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात

आप्पासाहेब बिरनाळेंना संधी

वसंतदादा प्रदेशाध्यक्ष असल्याने सांगलीतून त्यांनी आप्पासाहेब बिरनाळे यांना संधी दिली. बिरनाळे यांनी ज्येष्ठ वकील केशवराव चौगुले यांचा 5182 मतांनी पराभव केला. शिराळ्यात वसंतराव नाईक दुसर्‍यांदा निवडून आले. त्यांनी यशवंतराव चंदू्र पाटील यांचा 27 हजार 140 मतांनी पराभव केला. वाळव्यातून विद्यमान मंत्री राजारामबापू पाटील यांनी ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील यांचा पुन्हा एकदा 18 हजार 299 मतांनी पराभव केला.

कवठेमहांकाळ नावाने यावेळी मतदार संघाचे नाव बदलण्यात आले

कवठेमहांकाळ नावाने यावेळी मतदार संघाचे नाव बदलण्यात आले होते. येथून काँग्रेसच्या बी. एस. कोरे यांनी आर. आर. देशमुख यांचा मोठ्या फरकाने 27 हजार 529 मतांनी पराभव केला. जतचे विद्यमान आमदार टी. के. शेंडगे यांनी यावेळी आटपाडी मतदारसंघातून नशीब आजमावले परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला .

खानापूरमधून संपतराव माने दुसर्‍यांदा विजयी झाले.

खानापूरमधून संपतराव माने दुसर्‍यांदा विजयी झाले. त्यांनी हणमंतराव पाटील यांचा 2746 मतांनी पराभव हणमंतराव पाटील यांनीही विटा येथे आपले बस्तान बसविण्यास सुरूवात केली होती, त्यांनी संपतराव मानेच्या विरोधात शत्रू ठोकला पण केवळ 2746 मतांनी त्यांचा पराभव झाला. तासगावमधून विद्यमान आमदार जी. डी. बापू लाड यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे बी. जी. पाटील यांनी त्यांचा 9418 एवढ्या मताने पराभव केला. मिरजेत पुन्हा एकदा जी. डी. पाटील यांनी बाजी मारली त्यांनी एन. आर. पाठक यांचा 3267 मतांनी पराभव केला, जतमध्ये काँग्रेसचे उमेदवार एस. टी. बामणे यांनी बी. एल. पवार यांचा 13 हजार 526 मतांनी पराभव केला. याही निवडणुकीत जिल्ह्यातील आठही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

© पाच वर्ष दादा प्रदेशाध्यक्ष होते. राज्यात 270 जागांपैकी काँग्रेसला 203 जागा मिळाल्या.
1967 साली देशात 9 राज्यात काँग्रेसची सरकारे पराभूत झाली. महाराष्ट्रात मात्र वसंतदादा प्रदेशाध्यक्ष आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री या जोडगोळीने 203 जागा निवडून आणल्या.

राजारामबापूंचा मंत्रीमंडळात दुसर्‍यांदा समावेश करण्यात आला.

वसंतदादा पाटील प्रदेशाध्यक्ष असल्याने सांगली जिल्यावर त्यांची मजबूत पकड निर्माण झाली.
स्थानावर नेल्यानंतर पक्षाने वसंतदादा यांना 1972 मध्ये विधानपरिषदेवर घेतले. त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.
मागील पंचवार्षिमध्ये मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. वसंतराव नाईक यांनी पुन्हा एकदा राजारामबापू पाटील यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला मंत्रीपदाची संधी दिली. राजारामबापू पाटील यांना उद्योग आणि वीज या महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. वसंतदादा प्रदेशाध्यक्ष झाल्याने राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. राज्याच्या कानाकोपन्यात त्यांनी आपला गट निर्माण केला.

हेही वाचा

खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज