rajkiyalive

CRIME : गांजा विक्रीसाठी आलेला कोथळीचा तरुण जेरबंद : 4 किलो गांजासह 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त.

सांगली :

CRIME : गांजा विक्रीसाठी आलेला कोथळीचा तरुण जेरबंद : 4 किलो गांजासह 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त. : शहरातील सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या कोथळीच्या तरुणाला जेरबंद करून त्याच्याकडील 4 किलो 398 ग्रॅम वजनाचा गांजासह 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

CRIME : गांजा विक्रीसाठी आलेला कोथळीचा तरुण जेरबंद : 4 किलो गांजासह 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त.

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली. या प्रकरणी अरिहंत राजगोंडा पाटील (वय 32 रा. जैन मंदिर जवळ, कोथळी, जि. कोल्हापूर) याला अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तैनात होते. यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांना मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास संशयित अरिहंत पाटील हा सांगलीवाडी टोलनाक्याजवळील शुभ मंगल कार्यालयाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतले.

त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतले. त्याची पिशवी तपासली असता 4 किलो 398 ग्रॅम वजनाचा 84 हजार रूपयाचा गांजा मिळाला. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा 1 लाख 73 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस हवालदार मच्छिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अरिहंत पाटीलविरूद्ध अंमली औषधी द्रव व मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार, अंमलदार संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, योगेश सटाले यांच्या पथकाने केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज