rajkiyalive

धैर्यशील माने यांच्या विजयामुळे गौरव नायकवडी किंगमेकर हा चुकीचा समज

जनप्रवास, वाळवा

धैर्यशील माने यांच्या विजयामुळे गौरव नायकवडी किंगमेकर हा चुकीचा समज : “हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा निसटता विजय झाला असताना हुतात्मा  संकुलाकडून गौरव नायकवडी किंगमेकर असल्याचा होत असलेला प्रचार चुकीचा असल्याचे मत , ” माजी जि .प .
सदस्य व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्रभाऊ पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले . यावेळी माजी पं.स.उपसभापती नेताजी पाटील बाबा,  राजारामबापू बँकेचे संचालक जयकर गावडे उपस्थित होते .

धैर्यशील माने यांच्या विजयामुळे गौरव नायकवडी किंगमेकर हा चुकीचा समज

राजेंद्रभाऊ पुढे म्हणाले , स्वतः धैर्यशील माने यांना विजयाची शाश्वती नव्हती . वारणेचे आ .विनय कोरे व इचलकरंजीचे प्रकाश आवाडे यांच्या सहकार्यामुळे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात दोन दिवस तळ ठोकून तन – मन – धना ने शर्थीचे प्रयत्न केल्याने हा विजय सुकर झाला . मुख्यमत्र्यांची वाळव्यात सभा व धरणग्रस्त मेळावा घेऊन वातावरण निर्मितीचा संकुलाने प्रयत्न केला , परतु तेवढ्याने मानेंचा विजय झाला असे म्हणता येणार नाही .

नेताजी पाटील म्हणाले ,हुतात्मा च्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये मानेना आघाडी मिळाली हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे.  मसुचीवाडी, शिरगांव , वाळवा , अहिरवाडी , गाताडवाडी  या गावामध्ये मविआचे उमेदवार पिछाडीवर होते तर अन्य गावात आघाडीवर होते .खुद्द वाळव्यात राष्ट्रवादीची कांही मते राजु शेट्टी यांना गेल्याने केवळ ५०४ मताची आघाडी महा
युतीला मिळाली . हुतात्माच्या कार्यक्षत्रातील गावांमध्ये सत्यजित पाटील यांना ६८ मतांची आघाडीच आहे.तर लोक सभामतदार संघातील गावांमधील धरणग्रस्त जनतेतून देखील त्यांना आघाडीच मिळाली आहे .

इचलकरंजी , हातकणंगले भागातून धैर्यशील माने याना बऱ्यापैकी लीड मिळाल्याने त्यांचा निसटता विजय झाला .या विजयाचे कींगमेकर असल्याचा हुतात्माचा कांगावा व्यर्थ आहे .

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज