rajkiyalive

कुणीतरी दखल घ्यावी म्हणूनच वैभव पाटलांचा टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न

 सुहास बाबर :  वैभव पाटलांवर जोरदार हल्लाबोल

जनप्रवास  विटा
ज्यांचा या सर्व घडामोडींशी काहीच संबंध नाही, त्यांनी कुणाच तरी ऐकून किंवा माझी दखल घ्यावी, म्हणून टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता खासदार संजयकाका पाटील यांनी राजीनामा देवू नये, यासाठी बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही गेल्या निवडणुकीत खासदार पाटील यांचे काम केले आहे. त्यावेळी तुम्ही कोठे होतात? असा सवाल करीत खासदार पाटील अडचणीत असताना तुम्ही विरोधात होता. वापरा आणि फेकून द्या, ही तुमची नेहमीची पद्धत आहे.
माजी मंत्री जयंत पाटील यांनाही तुम्ही असेच वापरून सोडून दिले. त्यामुळे आता अजितदादा पवार यांच्यासोबत तरी लोकसभा निवडणूकीपर्यंत रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती ज्याला तिकीट देईल, त्याचे काम करण्याची भूमिका घ्या, टेंभूसाठी सर्वांचे योगदान आहे हे आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही टेंभूला दिवास्वप्न म्हणाला होता तुम्हाला त्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी उपरोधीक टीका माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यावर केली.
          यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, पन्नास वर्षे सत्ता असताना तुम्ही गावातील लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी देऊ शकला नाहीत. त्यामुळे धरणातील पाण्यावर तुम्ही बोलू नये एकाच ठिकाणी स्थिर राहणे हा तुमचा इतिहास नाही. आता अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष झाला आहात, तर लोकसभेपर्यंत तिथे टिकून रहा. अन्यथा खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा तुम्ही केवळ वापर करून सोडून दिले आहे,

हेही वाचा

शंभूराज देसाई, आ. अनिलभाऊंवर जोरदार टीकास्त्र

     ते पुढे म्हणाले, वैभव पाटील यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर टिका करण्यामागे त्यांना असणारा पोटशूळ लक्षात घ्यावा लागेल. विट्यातील शितोळे समाजाचे दैवत असणाऱ्या भैरोबा देवाच्या रस्त्याचा प्रश्न मंत्री देसाई यांनी सोडवल्याने शितोळे समाज आमदार अनिल बाबर यांच्या बरोबर राहण्याची मिती त्यांना वाटत असावी. गेली पन्नास वर्षे विट्याची सत्ता तुमच्याकडे आहे. पण गावातील लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी आपण देऊ शकला नाहीत. त्यामुळे धरण वगैरे मोठ्या गोष्टींची चर्चा आपण न केलेली बरी.
कोयना धरणात शिल्लक असणारे पाणी आणि टंचाई परिस्थितीत जिल्ल्याला आवश्यक असणारे पाणी यामध्ये दहा ते बारा टीएमसीची तूट आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्याचे आव्हान प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोर असणार आहे. याच पार्श्वभूमीवर नेहमीच सातारा जिल्ह्यात होणारी कालवा समितीची बैठक यावेळी पहिल्यांदाच सांगली जिल्हयात झाली. यामध्ये झालेली चर्चा समजून घेतली असती, तर खासदार संजयकाका पाटील आणि वैभव पाटील यांनीही आमदार अनिलभाऊ बाबर यांच्यावर टिका केली नसती. शिवाय टंचाई परिस्थितीत निर्देश असल्याशिवाय पाणी सोडता येत नाही.
त्यामुळे तसे निर्देश प्रशासनाला द्यावेत, यासाठी आमदार अनिल बाबर पाठपुरावा करीत होते. यासाठी जिल्हयातील लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी आमदार बाबर यांना पाठपुरावा करण्यासाठी मागणी केली होती. मग यामध्ये श्रेय घेण्याचा प्रश्न येतोच कुठे?, असा सवाल बाबर यांनी केला.
शंभुराजेंवर टीका करण्यामागे दुखणे वेगळेच 
 ना. शंभूराजे देसाई यांनी आमच्या माध्यमातून पाटण येथील भैरोबा देवस्थानचे चांगले काम केले आहे. त्यामुळे या कामामुळे विट्यातील शितोळे समाज प्रभावित झाला आहे. हेच दुखणे असल्याने वैभव पाटील यांनी मंत्री देसाई यांच्यावर टिका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात आमची भुमिका काय होती हे महाराष्ट्र जाणतो, आम्ही मुख्यमंत्र्यांना छोटे केले का मोठे केले हे तुम्ही सांगु नका. आमदार होण्याची तुम्हाला थोडी जास्तच गडबड झाली आहे थोडा वडिलांचा पण सल्ला घेत जावा.आता आपणाला मोदींजीना पंतप्रधान करावयाचे आहे. तुम्ही अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष झाला आहात. तुमच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे त्यामुळे जिथे आपल्या मित्रपक्षाचा आमदार नाही त्या वाळवा, तासगांव, शिराळयात मताधिक्य देण्याचे काम करा, अशी घणाघाती टीका सुहास बाबर यांनी केली.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज