rajkiyalive

मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून प्रयत्न होतीलः आ.जयंत पाटील

इस्लामपूर ः प्रतिनिधी
मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून प्रयत्न होतीलः आ.जयंत पाटील : आपणास मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न होतील. मात्र माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची शपथ शहरातील पदाधिकारी, बुथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी घेतली.

मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून प्रयत्न होतीलः आ.जयंत पाटील

इस्लामपूर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बूथ अध्यक्षांना निवडपत्रे प्रदान समारंभ ते बोलत होते. यावेळी सर्वोत्कृष्ठ काम केलेल्या पाच बूथ अध्यक्ष व त्यांच्या सहकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. युवा नेते प्रतिकदादा पाटील प्रसिध्द व्याख्याते यशवंत गोसावी, माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रा.शामराव पाटील, अरुणा पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, खंडेराव जाधव, संदीप पाटील, पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कृष्णेचे संचालक संजय पाटील व राजारामबापूचे संचालक शैलेश पाटील यांच्याकडून विधानसभेला विक्रमी मताधिक्य देणार्‍या बुथना अनुक्रमे 1 लाख व 50 हजाराचे बक्षिस जाहीर केले. आ.पाटील म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जनतेचे मोठे पाठबळ मिळणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. आपले सरकार आल्यानंतर शहर, तालुक्यातील उर्वरीत विकासकामांना गती देऊ. आतापासूनच एकसंघपणे कामाला लागा. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. बदलापूर व मालवणच्या घटनेने राज्यातील जनतेमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. सरकारला प्रायश्चित देण्याची जनतेची मानसिकता आहे. यशवंत गोसावी म्हणाले, पक्ष व घरे फोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालेले राज्याने पाहिले. जयंतराव साहेबांच्या रूपाने राज्याला निष्ठावंत मुख्यमंत्री द्यायचा आहे. ते राज्याची मुलूखगिरी करताना आपणास मतदारसंघ सांभाळावा लागेल.

बुथ अध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सूक्ष्म नियोजन करून कामाला लागावे. यावेळी अँड.चिमण डांगे, खंडेराव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विश्वनाथ डांगे, संजय पाटील, अँड.धैर्यशिल पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, अरुण कांबळे, सुरेंद्र पाटील, दिग्विजय पाटील, शंकरराव चव्हाण, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, शैलेश पाटील, सचिन कोळी, स्वरूप मोरे, अभिमन्यू क्षिरसागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, बूथ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवक सरचिटणीस अभिजित रासकर यांनी सूत्रसंचालन केले. महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पुष्पलता खरात यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज