सांगली :
SANGLI : गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू : दाखल्यासाठी मृतदेहासह शोधकर्नाटकातील एका भागात गर्भपात करताना एका बत्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नातेवाईक त्या महिलेच्या मृतदेहासह चारचाकीतून सांगलीत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली.
बसस्थानक परिसरात आज सायंकाळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, मृत महिला मिरज तालुक्यातील एका गावाची माहेरवाशीन आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तिचे सासर आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
SANGLI : गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू : दाखल्यासाठी मृतदेहासह शोध
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत महिलेचा पती सैन्य दलात आहे. तिला दोन मुली आहेत. ती गरोदर असल्याने घरातील नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात गर्भलिंग चाचणी केल्याचे समजते. अहवाल मिळताच त्यांनी तातडीने गर्भपात करण्यासाठी कर्नाटक राज्यातील चिकोडी येथील महालिंगपुरम गाठले. तेथील एका रुग्णालयात महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही वेळाने तिचा मृत्यू झाला. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.
मृत्यू प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यामध्ये अडचण येत होती.
दरम्यान, मृत महिलेस चारचाकीत घालून तिचे नातेवाईक मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आज सायंकाळी सांगलीत आले होते. त्यांच्यासमवेत मिरज तालुक्यातीलच एक डॉक्टरही होते. या प्रकारची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना बसस्थानक परिसरात एक चारचाकी थांबलेली निदर्शनास आली. चारचाकी बाहेर थांबलेल्या हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी चारचाकीची पाहणी केली. त्यामध्ये महिलेच्या मृतदेहासह दोघे बसल्याचे दिसले.
पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला. त्यांनी तातडीने चारचाकी शासकीय रुग्णालयाकडे नेली.रात्री उशीरापर्यत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नव्हता. हा गुन्हा चिकोडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.