gulabrav patil news : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे : —डॉ. तारा भवाळकर : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. त्यांनी लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहीजे. सांगलीत मला सहकार कळाला. गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला आहे. छ. शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारण ऐवजी राजनिती हा शब्द आहे. लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे. धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही. अडलेल्या लोकांना उभं करायचे काम सहकार करते. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत. असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी केले. सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते.
gulabrav patil news : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे : —डॉ. तारा भवाळकर
स्वागत व प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवन गौरव व ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचे हे २५ वे वर्ष आहे. पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता. मा. बाळासाहेब थोरात, प्रा. डॉ. सदानंद मोरे, डॉ. लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले आहे.दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणावह आहे.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, माझ्या दृष्टीने हा पुरस्कार आनंद, अभिमान व भाग्याची गोष्ट आहे.
प्रामाणिक हेतू हे माझ्या कामाचे सूत्र आहे. मानवी कल्याणाचे कार्य सहकार करते. यशवंतराव चव्हाणांनी मला ताकद, प्रेरणा व मदत दिली सहकार उभा राहिला.. सभासद महत्वाचा असतो. सहकार टिकला पाहिजे. गुलाबरावांचे नाव सहकार, संसद, व काँग्रेस पक्ष यामध्ये अग्रणी आहे. त्यांचे कार्य पृथ्वीराज पुढे चालवतात. जगाचा इतिहास बदलण्याची ताकद लेखकात असते. राजसत्ता लेखकावर, मिडियावर बंधन घालू शकत नाही. पृथ्वीराजबाबा चांगले काम करतात. जिद्दी आहेत. पुन्हा निवडून येतील.
People need freedom of expression in democracy : —Dr. Tara Bhavalkar
डॉ. लता देशपांडे म्हणाल्या, ‘ कौटुंबिक सामाजिक व वैयक्तिक स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी बालशिक्षण, बालसंस्कार व समाजोन्नतीचे काम केले आहे. प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले,’ शिवरायांच्या राजकारणाला राजनितीचा आधार व अधिष्ठान होते. आजच्या राजकारणात राजनितीचे अधिष्ठान कमी होत आहे. महाराष्ट्र धर्मात सहकार चळवळ मोडते. संत साहित्य महत्त्वाचे. सहकार ही अध्यात्मिक चळवळ आहे. वारकरी दिंडी हीही सहकारच आहे. सहकारतीर्थ गुलाबरावांनी सहकाराचे पावित्र्य टिकवले.
डॉ. विश्वजीत कदम यांनी गुलाबरावांचे कर्तृत्व महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे आहे . अनेक क्षेत्रातील त्यांचे काम नव्या पिढीला प्रेरणादायी आहे पृथ्वीराज पाटील त्यांचा विचार पुढे नेत आहेत असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार जयंतराव पाटील यांनी, ‘गुलाबराव पाटील यांचे सहकार चळवळ व काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान आहे.
त्यांनी सांगली जिल्ह्य़ातील सहकार सांभाळलं. बँकेची प्रधान वास्तू उभी केली. निस्पृह सेवा व मतप्रदर्शन हा त्यांचा स्थायीभाव होता. राजकारणाचा साध्य म्हणून वापर सध्या होत आहे हे वाईट आहे. विचारवंतांना जपलं पाहिजे. शहर विकासासाठी त्यांना जपा. आक्रमक मांडणी नव्या पिढीला बरं वाटतं पण ते चांगले नाही. अमेरिका जगाचं नेतृत्व करणारी पण आता स्वतःचा विचार करत आहे. देशावर २१० लाख कोटी कर्ज आहे. सारासार विचार साहित्य देतं. व्यसनाधीनता वाढत आहे. पुस्तक वाचन सवय हवी. मोबाईल व्यसन कमी करा.
आभार ऋतुराज पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले. यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत, विरेंद्रसिंह पाटील, संजय बजाज,माजी नगरसेवक हरिदास पाटील,अभिजित भोसले, आयुब बारगीर,रज्जाक नाईक,डॉ. संजय पाटील, ए. डी. पाटील, हुल्याळकर मामा,अशोक रेळेकर, बी. ए. पाटील, आनंदराव नलावडे, जयपाल चिंचवाडे, बाळासाहेब गुरव,नेताजी पाटील आबा, एस. बी. तावदारे, अजित पाटील बेनाडीकर, डॉ. दयानंद नाईक, डॉ. विजयकुमार शहा, बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, सनी धोतरे, सत्कारमूर्तींचे कुटुंबिय, त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, आप्तेष्ट, मित्रमंडळी, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहकार व साहित्य प्रेमी मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



