rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला

dineshkumar aitawade 9850652056

HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला : मतदार संघात प्रचंड नाराजी, गेल्या पाच वर्षात कोणताही संपर्क नाही, विकासकामांचा तर पत्ताच नाही, अशाही परिस्थिीतीत मिरज पश्‍चिम भागात धैर्यशील माने यांना 9 हजार 377 मते मिळाली. याला एकमेव कारण म्हणजे कवठेपिरानचे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर दोन दिवस कवठेपिरानमध्ये भीमराव माने यांची भेट घेतली आणि त्यांच्यावर या आठ गावांची जबाबदारी सोपवली. भीमराव माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास सार्थ ठरवत या आठ गावातून 9 हजार 377 मते मिळवून देण्यात यशस्वी झाले.

HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला

भीमराव माने यांनी जर धैर्यशील माने यांचे काम केले नसते तर हीच मते राजू शेट्टी किंवा सत्यजित पाटील यांना पडली असती, आणि कदाचित निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी भीमराव माने यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहे.

HATKANANGLE LOKSABHA :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला : गेल्या चार लोकसभा निवडणुकीपासून मिरज पश्‍चिम भागातील कसबे डिग्रज सर्कल हे हातकणंगले लोकसभा मतदार संघाला जोडले गेले आहे. पहिल्या निवडणुकीपासूनच येथील समडोळी, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कवठेपिरान, तुंग, कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज ही गावे राजू शेट्टींच्या मागे राहिली आहेत. या भागात सुमारे 45 हजाराचे पॉकेट आहे. यापैकी कायमच 70 टक्के मतदान होते. यंदाही तेच झाले. सुमारे 30 हजार मतदान झाले.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजू शेट्टी यांची उमेदवारी नक्की होती.

राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी आपल्यात सामावून घेण्यास तयार होती. परंतु त्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतली. दुसरीकडे विद्यमान खासदार असणार्‍या धैर्यशील मानेंबद्दल प्रचंड नाराजी होती. गेल्या पाच वर्षात तर त्यांचा संपर्कच नव्हता. विकासकामेही म्हणावी तशी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. त्यांना तिकीट देवू नका असे त्यांच्याच पक्षातील लोक सांगत होते. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकत पुन्हा एकदा उमेदवारी दिली.

उमेदवारी मिळूनही धैर्यशील माने आष्टा सोडून इकडे आले नाही.

या भागातील कोणत्याच गावात त्यांची साधी सभाही झाली नाही. कोणता नेता इकडे फिरकला नाही. शेवटच्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी वाळव्यात तळ ठोकला. कवठेपिरानमध्येही त्यांनी भीमराव मानेंची भेट घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मानेंना निवडून आणायचे यासाठी गळ घातले. भीमराव मानेंना या आठ गावांचा अनुभव होताच. यापूर्वी त्यांनी याच भागातून जिल्हा परिषदेला निवडून गेले होते. प्रत्येक गावातील खडानखडा माहिती आहे. कोठे नाक दाबल्यावर कोण तोंड उघडते हे ते पूर्ण जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी चक्रे फिरवली आणि फासे उलटे पडायला सुरूवात झाली. प्रत्येक गावात त्यांना मानणारा थोडा तरी वर्ग आहेच आणि या निवडणुकीत पूर्ण नव्हे विजयापुरते त्यांना मते हवी होती. विरोधकांना जागेवरच रोखण्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरूडकरांना म्हणावे तशी आघाडी घेता आली नाही. सरूडकर आणि धैर्यशील माने समान पुढे गेले. राजू शेट्टींना नाममात्र 3 हजाराची आघाडी मिळाली.

एकंदरीत भीमराव माने यांनी लावलेल्या जोडण्यांमुळेच या भागात धैर्यशील मानेंना मते मिळाली आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास भीमराव मानेंनी सार्थ ठरविला असेच म्हणावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज