rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : प्रकाश आवाडेंच्या उमेदवारीने शिवसेनेत खळबळ

इचलकरंजी / चिदानंद आलुरे
HATKANANGLE LOKSABHA : प्रकाश आवाडेंच्या उमेदवारीने शिवसेनेत खळबळ : हातकणंगलेच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांची ताराराणी पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्याला धक्का बसला असून जाहीर झालेली ही उमेदवारी निर्णयांकी ठरणारी असल्याने शिवसेना गोटात खळबळ माजली आहे.या पार्श्वभूमीवर शनिवार सायंकाळी काही तासासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरात दाखल होत आहेत.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

HATKANANGLE LOKSABHA : प्रकाश आवाडेंच्या उमेदवारीने शिवसेनेत खळबळ

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व आत्ताचे उमेदवार राजू शेट्टी यांना आमदार प्रकाश आवाडेंनी जाहीर सभेत ठणकावून अंगावर घेतले आहे.तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याही कामाबद्दल जाब विचारत त्यांच्याही उमेदवारीला प्रथमपासूनच एकप्रकारे विरोध दर्शविला होता.एवढेच नव्हेतर संपूर्ण हातकणंगले मतदार संघातही माने यांच्याबद्दल नाराजी आहे. निवडून येण्याचे मेरिटस् नव्हते तरीही धैर्यशील मानेंना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे पन्हाळ्याचे विनय कोरे, इचलकरंजीचे प्रकाश आवाडे व शिरोळचे राजेंद्र पाटील यड्रावकर हे तीन महत्वाचे अपक्ष आमदार नाराज असल्याने ते गेले काही दिवस थंड होते .

पण उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जशी जवळ येत गेली तशी या त्रिमूर्ती हालचालींनी वेग घेतला.

दोन दिवसापूर्वी या तीनही आमदारांच्या एकमेकांच्या निवासस्थानी गाठी भेटी झाल्या शेवटच्या रात्री (गुरुवार)शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमदार प्रकाश आवाडे यांची इचलकरंजीत निवासस्थानी भेट घेतली व बंद खोलीत चर्चा केली.अन् आज सकाळी ताराराणीकडून प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली. यामुळे ही उमेदवारी कोणाकोणाची आहे ? याची फक्कड चर्चा रंगत आहे.

मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या निवडणुकीत

उतरलो असून, आपणच विजयी होऊ असा ठाम विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून यांच्या उमेदवारीमागे नक्कीच भारतीय जनता पार्टी असावी याबद्दलही चर्चा होत आहे. माजी खासदार व जेष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले आहेत तर गेली पाच वर्षे जिल्हापरिषद सदस्य राहूल आवाडे यांनी या मतदार संघात निरनिराळ्या कामाच्या निमित्ताने कार्यरत राहीले आहेत त्यामुळे मतदारांना आवाडे माहिती आहेत.

या सर्व घडामोडीने राज्याच्या शिवसेनेत खळबळ माजली असून उद्या मुख्यमंत्री दिवसभर बुलढाणा, संभाजीनगर दौरा करुन सायंकाळी कोल्हापूरात लैंड होणार आहेत.यासाठी एका हॉटेलमध्ये चर्चाही करणार आहेत.

HATKANANGLE LOKSABHA : हातकणंगलेत यंदा वंचितचा फटका कोणाला?

ताराराणी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज बैठक

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षातर्फे
आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजनार्थ शनिवार 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ताराराणी पक्ष कार्यालयात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आवाडे समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.

ताराराणी पक्षाच्यावतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रकाश आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा शुक्रवारी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील पुढील दिशा, रणनिती याच्या नियोजनार्थ ताराराणी पक्ष कार्यालय येथे शनिवारी सकाळी 10 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस ताराराणी पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आवाडे समर्थकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दत्तवाडे यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज