महाविकास आघाडीची भिस्त पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यावरच असणार आहे. कारण गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी महाविकास आघाडीत येतील, असा आशावाद बोलून दाखविला आहे.
दिनेशकुमार ऐतवडे, सांगली
लोकसभेच्या निवडणुका कधी लागतील काही सांगता येत नाही. भाजपने मिशन 45 अंतर्गत राज्यात सर्वत्र आपली तयारी सुरू केली आहे. 48 लोकसभा मतदार संघात आपला उमेदवार निवडून यावा याासाठी जो तो पक्ष प्रयत्न करणार यात काही शंका नाही. इंडियाची निर्मिती तर झाली आहे, परंतु अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. तिकडे अकोलामध्ये अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आपली उमेदवारी जाहीरही करून टाकली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडीत मात्र अद्याप सामसूम आहे. महाविकास आघाडीची भिस्त पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्यावरच असणार आहे. कारण गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी महाविकास आघाडीत येतील, असा आशावाद बोलून दाखविला आहे.
हेही वाचा
रघुनाथदादा पाटील बी.आर.एस. पक्षात
गेल्या पाच वर्षात राजकारण भरपूर बदलले
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन लोकसभा मतदार संघाचा समावेश होतो. सध्या या दोन्ही मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे अनुक्रमे संजय मंडलीक आणि धैर्यशिल माने हे विद्यमान खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत संजय मंडलिकांनी धनंजय महाडिकांचा तर धैर्यशील माने यांनी राज्ाू शेट्टींचा पराभव केला होता. दोन्ही पराभूत उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उभे होते. गेल्या पाच वर्षात राजकारण भरपूर बदलले. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला तर राजू शेट्टींनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा
भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन
संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..
तर पुन्हा मैदानात – विलासराव जगताप
भाजपनेही या दोन्ही जागांसाठी आग्रही आहे.
सध्या शिवसेना शिंदे गटाने या दोन्ही जागांवर दावा केला आहे. आम्ही विद्यमान खासदार असल्याने या दोन्ही जागा आम्हालाच मिळायला हवे, अशी त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे त्यांचा मित्रपक्ष भाजपनेही या दोन्ही जागांसाठी आग्रही आहे. हातकणंगलेमधून प्रकाश आवाडे यांचे पूत्र राहूल आवाडे यांनी तयारी सुरू केली आहे. माजी आमदार हाळवणकर यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे काही ठिकाणही सांगितले आहे. गेल्या दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन भाजपला करावे लागणार आहे. इंचलकरंजी विधानसभा मतदार संघात आ. प्रकाश आवाडेंनी ठाण मांडल्याने तसेच त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्य स्वीकारल्याने आवाडेंना विधानसभेची उमेदवारी द्यावीच लागणार आहे. त्यामुळे हाळवणकरांनी लोकसभेवर दावा सांगितला आहे.
हेही वाचा
वारसा असूनही… न झालेले आमदार...
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्यातरी उमेदवारांची वाणवा
विरोधी पक्षात असणारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्यातरी उमेदवारांची वाणवा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभाच बरी अशी बर्याची नेत्यांंची इच्छा आहे. कारण लोकसभा मतदार संघ आकाराने मोठा असतो. तसेच विजयची खात्रीही देता येत नाही. त्यामुळे आपल्या आवाक्यात असणार्या विधानसभेसाठी बरेच जण इच्छुक आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात सध्या शिरोळ, इंचलकरंजी, हातकणंगले, शाहूवाडी, शिराळा आणि इस्लामपूर या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
प्रतिक पाटील यांची अधूनमधून चर्चा
या सहाही मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आदी मातब्बरांचा समावेश आहे. परंतु यापैकी कोणीही लोकसभेला इच्छुक आहेत. अधूनमधून जयंत पाटील यांचे पूत्र प्रतिक पाटील यांची अधूनमधून चर्चा होत असत. परंतु सध्या जयंत पाटील यांच्याबाबतीत अनेक वावड्या उठत असल्याने तेही लोकसभेला उतरतील असे वाटत नाही. शिवसेना ठाकरे गटातही लोकसभेला चालणारा चेहरा अजूनतरी समोर आला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडे शेवटी पर्याय आहे तो राजू शेट्टी यांचाच.
राजू शेट्टी यांनी दुसर्यांदा बाजी
राजू शेट्टी यांनी 2009 ची लोकसभा जिंकली ती भाजपच्या मदतीने. त्यांनी राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव केला. सध्याची जी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती पुन्हा एकदा 2014 ला उद्भवली. राष्ट्रवादीला ताकदीचा उमेदवार मिळाला नाही. जयंत पाटील यांनीच लोकसभेला उभे रहावे, अशी त्यांना गळ घालण्यात आली. परंतु ही जागा काँग्रेसला देवून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाणा आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. 80 वर्षाच्या या उमेदवाराने संपूर्ण लोकसभा मतदार संघ पिजून काढला परंतु त्यांना यश आले नाही. राजू शेट्टी यांनी दुसर्यांदा बाजी मारली. त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आणि दुसर्यांदा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.
राजू शेट्टींनी भाजपची साथ सोडली
2014 ला भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांनी सर्वच लहानमोठ्या पक्षांना सत्तेत सामावून घेतले. स्वाभिमानीच्या सदाभाउंनाही लॉटरी लागली आणि त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. इथेच स्वाभिमानीत ठिणगी पडली. सदाभाउंनी राजू शेटटींची साथ सोडली आणि भाजपच्या मांडवात दाखल झाले. भाजपन रविकांत तुपकरांवरही डाव टाकला. या सर्व गोष्टींना कंटाळून राजू शेट्टींनी भाजपची साथ सोडली आणि 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत सामिल झाले.
काँग्रेस राष्ट्रवादीला राजू शेट्टींसारखा तगडा उमेदवार आयताच मिळाला. परंतु दुसरीकडे भाजप सेनेनेही धैर्यशील मानेंसारखा ताकदीचा उमेदवार मैदानात आणला. निवडणुकीला जातीयतेचा कलंक लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतीलच काही नेत्यांनी राजू शेट्टींच्या पराभवसाठी कंबर कसली आणि राजू शेट्टींची हॅट्रीक चुकली. धैर्यशील माने मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
राष्ट्रवादीमध्ये सन्नाटा
पराभव झाल्याने राजू शेट्टीं मैदान सोडले नाही. त्यांनी पुन्हा एकदा मैदान मारायचेच या इराद्याने पायाला भिंगरी लावून लोकसभा मतदार संघ पिंजून काढत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीला समान अंतरावर ठेवून त्यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे. एकला चलोरेची भूमिका त्यांनी घेतली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात राजू शेट्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट यांनी तयारी सुरू केली असताना काँग्रस, राष्ट्रवादीमध्ये सन्नाटा आहे.
राजू शेट्टी महाविकास आघाडीत नक्की येतील : पृथ्वीराज चव्हाण
गेल्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा कोल्हापूर दौरा होता. त्यांनी या दौर्यामध्ये राजू शेट्टी महाविकास आघाडीत नक्की येतील, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचीही छकले झाली आहे. जयंत पाटील, मानसिंगराव नाईक यांनी शरद पवारांची साथ दिली आहे. शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी या मतदार संघात राष्ट्रवादी असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणी उमेदवारी मागितली तर आश्चर्य वाटायला नको. काँग्रेसचीही तीच अवस्था आहे. इस्लामपूर, शिराळा, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी आणि शाहूवाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना शोधावे लागणार आहे.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा राजू शेट्टींची व्होट बँक निश्चित जास्त
सध्याच्या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा राजू शेट्टींची व्होट बँक निश्चित जास्त आहे. त्यामुळे देशपातळीर भाजपच्या विरोधात जी इंडिया तयार झाली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी सहभागी झाले तर हातकणंगली जागा त्यांना मिळण्यास काहीच अडचण असणार आही. परंतु राजू शेट्ींनी सध्यातरी एकला चलोरेची भूमिका घेतली असली तरी भाजप विरोधात इंडियामध्ये ते सहभागी होतील असे वाटते, असे पृथ्वीराज चव्हाणांना वाटते. येणार्या काळातच याचे उत्तर मिळेल.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



